Satish Kaushik Prayer Meet : “जा तुझे माफ किया...”, अनुपम खेर यांची सतीश कौशिक यांच्यासाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:26 AM2023-03-21T10:26:31+5:302023-03-21T10:26:40+5:30

Satish Kaushik Prayer Meet : ‘जा तुला माफ केलं’, सतीश कौशिक यांच्याबद्दल अनुपम खेर असं का म्हणाले?

anupam kher get emotional at satish kaushik prayer meet | Satish Kaushik Prayer Meet : “जा तुझे माफ किया...”, अनुपम खेर यांची सतीश कौशिक यांच्यासाठी भावुक पोस्ट

Satish Kaushik Prayer Meet : “जा तुझे माफ किया...”, अनुपम खेर यांची सतीश कौशिक यांच्यासाठी भावुक पोस्ट

googlenewsNext

Satish Kaushik Prayer Meet  : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी 9 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काल २० मार्चला सतीश यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रार्थना सभेला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज पोहोचले. जॅकी श्रॉफ, विद्या बालन, बोनी कपूर अशा सगळ्यांनी कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. सतीश यांचे जवळचे मित्र अनुपम खेर (Anupam Kher) हेही यावेळी उपस्थित होते. प्रार्थना सभेत पूर्णवेळ ते सतीश यांची मुलगी वंशिकाचा हात पकडून दिसले. 

या प्रार्थना सभेनंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.या व्हिडीओमध्ये अनुपम खेर हे सतीश कौशिक यांच्या फोटोसमोर फुलं वाहताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं दु:ख स्पष्ट दिसतंय.   

‘जा, तुला माफ केलं. मला एकटं सोडून गेलास म्हणून. लोकांच्या हास्यात मी तुला नक्कीच शोधेन. मात्र प्रत्येक दिवशी मला आपल्या मैत्रीची, तुझी आठवण येईल. अलविदा माझ्या मित्रा.  बॅकग्राऊंडमध्ये तुझं आवडतं गाणं लावलंय. तू भी क्या याद रखेगा...’, अशा आशयाची भावुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’ हे गाणं ऐकू येत आहे. 

हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. मित्र असावा तर असा, असं एकाने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं आहे. अनुपम सर तुम्ही खरे यार आहात, असं एकाने म्हटलं. हीच खरी मैत्री, अशी भावना एका युजरने व्यक्त केली. सतीश कौशिक मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. 

Web Title: anupam kher get emotional at satish kaushik prayer meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.