​कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचे उत्तर झाले लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 14:48 IST2017-04-28T09:08:55+5:302017-04-28T14:48:56+5:30

बाहुबली या चित्रपटाच्या पहिल्या भागात एक मोठा सस्पेन्स या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ठेवला होता. या चित्रपटात कटप्पाने बाहुबलीला का मारले ...

The answer to the question was, why did Katappa knock Bahubali? | ​कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचे उत्तर झाले लीक

​कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचे उत्तर झाले लीक

हुबली या चित्रपटाच्या पहिल्या भागात एक मोठा सस्पेन्स या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ठेवला होता. या चित्रपटात कटप्पाने बाहुबलीला का मारले हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला चित्रपटगृहातून बाहेर पडताना पडला होता. या प्रश्नाचे उत्तर खरे तर प्रेक्षकांना 2016मध्ये मिळणार होते. पण काही कारणास्तव या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले गेले आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याची गेल्या कित्येक दिवसापासून लोक वाट पाहात असल्याने या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग कित्येक दिवसांपासून केले जात आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाची उत्सुकता लोकांमध्ये असल्याने अनेकजण चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहात आहेत. पण आता या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या प्रश्नाचे उत्तर सोशल मीडियावर लीक झाले आहे.
दुबईमध्ये हा चित्रपट सगळ्यात पहिल्यांदा प्रदर्शित झाला. तिथूनच या चित्रपटातील काही दृश्य लीक झाली असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल नेटवर्किंगला एक तीन मिनिटांचा व्हिडिओ फिरत आहे आणि या व्हिडिओत कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचे उत्तर आहे.
बाहुबलीला मारण्याचा कट कोणी रचला हे आपल्याला या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहे. बाहुबलीची आईच बाहुबलीला मारण्याचे काम कटप्पाला देते हे आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओत कटप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर असल्याने आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या व्हिडिओत चित्रपटाची सबटायटल ही उर्दूत दाखवली गेली असल्याने हा व्हिडिओ दुबईतील एखाद्या चित्रपटगृहातून लीक झाला असल्याचे म्हटले जात आहे. 
हा व्हिडिओ खरेच चित्रपटातील आहे की नाही हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळू शकते.

Web Title: The answer to the question was, why did Katappa knock Bahubali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.