प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 15:46 IST2018-05-18T10:16:16+5:302018-05-18T15:46:16+5:30

इंटरनेट सनसनी प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये देखील ती डोळ्यांनी इशारा करताना दिसून येत आहे.

Another video of Priya Light Warrior Viral! | प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल!

प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल!

्या प्रिया प्रकाश वारियर या नावाचे वादळ अजिबातच छमण्याची शक्यता दिसून येत नाही. केवळ २६ सेकंदाच्या व्हिडीओमुळे इंटरनेट सनसनी बनलेल्या प्रियाचा कुठलाही फोटो अथवा व्हिडीओ शेअर केल्यास तो वाºयासारखा व्हायरल होतो. दरम्यान, प्रियाच्या ‘ओरू अदार लव’ या गाण्याचा आणखी एक टीजर रिलिज करण्यात आला असून, तो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यावेळी प्रिया प्रकाश स्कूलमध्ये नव्हे तर एका प्रयोगशाळेत आपल्या अदा दाखविताना दिसत आहे. ती लॅबमध्ये आपल्या अदा दाखवित काम करीत आहे. तर तिचा को-स्टार रोशन अब्दुल खूपच छान दिसत आहे. सध्या या दोघांचा व्हिडीओ यू-ट्यूबवर ट्रेंड करीत आहे आणि मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. 



प्रिया प्रकाश वारियरच्या या नव्या गाण्याचे वैशिष्ट तिचे एक्सप्रेशन्स आहेत. यावेळेसही प्रियाचे जुनेच एक्सप्रेशन्स बघावयास मिळत आहेत. तिचा सुंदर आणि प्रेमळ चेहरा या गाण्याला आणखी खास बनवितो. ऐवढेच काय तर या गाण्यात ते स्कूलदेखील बगावयास मिळत आहे. गाण्यात रोशन प्रियाच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसत आहे. वातावरण आणि गाणे दोन्ही कमालीचे आहे. मात्र सर्वात जास्त आकर्षण प्रियाचे एक्सप्रेशन्स हेच आहे. तिची स्माइल या गाण्याचा यूएसपी म्हणावा लागेल. 



‘ओरू अदार लव’ला उमर लुलू यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रिया प्रकाशच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनही लावला जात आहे की, तिच्या इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंगची संख्या ६० लाखांपेक्षा अधिक आहे. तिच्याबद्दल हेदेखील सांगितले जाते की, ती प्रमोशनल पोस्टसाठी आठ लाख रुपये चार्ज करते. प्रिया प्रकाशचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला होता. ती त्रिशूरच्या विमला कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ‘ओरू अदार लव’मध्येदेखील प्रियाने एका विद्यार्थिनीचीच भूमिका साकारली आहे. 

Web Title: Another video of Priya Light Warrior Viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.