बॉलिवूडला मिळाला आणखी एक नवा चेहरा, कोण असेल ती? वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 09:34 AM2017-09-03T09:34:56+5:302017-09-03T15:39:23+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या बरेचसे नवे चेहरे एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. यात सर्वात जास्त स्टार किड्सच्या नावांची चर्चा आहे. काहींनी तर ...

Another new face is Bollywood, who is it? Read detailed! | बॉलिवूडला मिळाला आणखी एक नवा चेहरा, कोण असेल ती? वाचा सविस्तर!

बॉलिवूडला मिळाला आणखी एक नवा चेहरा, कोण असेल ती? वाचा सविस्तर!

googlenewsNext
लिवूडमध्ये सध्या बरेचसे नवे चेहरे एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. यात सर्वात जास्त स्टार किड्सच्या नावांची चर्चा आहे. काहींनी तर प्रत्यक्षरीत्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली आहे. अशात आणखी एक नवा चेहरा बॉलिवूडला मिळाला असून, लवकरच प्रेक्षकांना या अभिनेत्रीच्या अदा बघावयास मिळणार आहेत. आम्ही डोना मुंशी हिच्याबाबत सांगत आहोत. आतापर्यंत रंगमंचावर आपले टॅलेंट दाखविणारी डोना, रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनविण्यात येत असलेल्या चित्रपटांमध्ये बघावयास मिळणार आहे. 

या अगोदर डोना एका लघुपटात झळकली होती. आकर्ष खुराणा यांच्या दिग्दर्शनांतर्गत बनविण्यात येत असलेल्या या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत बघवायास मिळणार आहे. त्याचबरोबर दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता ममूटी यांचा मुलगा दिलकीर सलमानही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात मिथिला पालकरचीही भूमिका आहे. मिथिलाला इंटरनेट सेन्सेशन म्हटले जाते. तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात इमरान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. 



दरम्यान, डोनाच्या या चित्रपटाची कथा आणि नावाचा अद्यापपर्यंत खुलासा केला गेला नाही. मात्र चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, संपूर्ण टीम सध्या उटी येथे आहे. चित्रपटाचा काही भाग कोची येथे शूट केला जाणार आहे. डोनाचे पदार्पण प्रेक्षकांना कितपत भावणार हे बघणे मजेशीर ठरेल. दरम्यान, सध्या बॉलिवूडमध्ये नव्या चेहºयांची रेलचेल आहे. आगामी काळात बºयाचशा स्टार किड्ससह अनेक नवे चेहरे बॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. 

Web Title: Another new face is Bollywood, who is it? Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.