​ट्विंकल खन्ना लिहितेय आणखी एक पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:22 IST2017-07-29T09:52:25+5:302017-07-29T15:22:25+5:30

ट्विंकल खन्ना एक अभिनेत्री म्हणून यश मिळवू शकली नाही. मेला, जब प्यार किसी से होता है यांसारख्या चित्रपटांमध्ये ती ...

Another book, Twinkle Khanna, is written | ​ट्विंकल खन्ना लिहितेय आणखी एक पुस्तक

​ट्विंकल खन्ना लिहितेय आणखी एक पुस्तक

विंकल खन्ना एक अभिनेत्री म्हणून यश मिळवू शकली नाही. मेला, जब प्यार किसी से होता है यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. पण तिच्या कोणत्याही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. तसेच तिच्या कोणत्याही भूमिकेचे प्रेक्षकांनी किंवा समीक्षकांनी कौतुक केले नाही. पण एक लेखिका म्हणून तिने तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. मिसेज फनीबोन्स हे तिचे पुस्तक तर खूप गाजले होते. त्यानंतर तिने द लेजेंट ऑफ लक्ष्मी प्रसाद हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक देखील वाचकांना खूपच आवडले. आता ट्विंकल खन्ना तिसरे पुस्तक लिहित आहे.
जुग्गरनॉट बुक्सचे प्रमुख अनीश चंडी यांनीच ही बातमी मीडियाला दिली आहे. त्यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ट्विंकल खन्ना सध्या तिच्या तिसऱ्या पुस्तकावर काम करत आहे. तिने पुस्तक लिहायला सुरुवात केली असून हे पुस्तक या वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत लिहून पूर्ण होईल. या पुस्तकाचा विषय काय असणार याविषयी त्यांना विचारले असता ते सांगतात, पुस्तकाचा विषय काय असणार हे मी आता सांगू शकणार नाही. पण हे पुस्तक गेल्या पुस्तकाप्रमाणेच मजेशीर असणार एवढे मी नक्कीच सांगेन. द लेजेंट ऑफ लक्ष्मी प्रसाद हे पुस्तक जुग्गरनॉट प्रकाशननेच प्रकाशित केले होते. 
ट्विंकल एक प्रसिद्ध लेखिका असण्यासोबत एक इंटेरिअर डिझायनरदेखील आहे. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची ही मोठी मुलगी असून तिने प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीदेखील आहे. 

Also Read : ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना कोणाले म्हणायचे छोटे पापा?

Web Title: Another book, Twinkle Khanna, is written

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.