अक्षय कुमारच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट
By तेजल गावडे | Updated: November 10, 2020 18:06 IST2020-11-10T18:03:11+5:302020-11-10T18:06:00+5:30
मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की अक्षय कुमारकडे सध्या दहा चित्रपट आहे.

अक्षय कुमारच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार वर्षाला चार ते पाच सिनेमाक काम करतो. २०२०बद्दल सांगायचं तर त्याने काही दिवसांपूर्वी रंजीत तिवारीचा स्पाई थ्रिलर बेल बॉटमचे शूटिंग केले आहे आणि सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट पृथ्वीराजमध्ये व्यग्र आहे. पृथ्वीराज चित्रपटानंतर अक्षय कुमार दिग्दर्शक आनंद एल रायचा अतरंगी रेचे शूटिंग करणार आहे आणि त्यानंतर साजिद नाडियादवाला बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या बच्चन पांडेच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.
अक्षय कुमारचा आगामी चित्रपटांची यादी इथे संपत नाही, तो बच्चन पांडेनंतर एकता कपूरचा एक्शन कॉमेडी चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे आणि लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारने दिग्दर्शक मुदस्सर अजीजचा आगामी चित्रपटदेखील साइन केला आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने मुदस्सर अजीजच्या आगामी चित्रपटाची कथा ऐकली आहे आणि त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. असे सांगितले जात आहे की अक्षय कुमार नेहमी खऱ्या आयुष्यातील कथा आणि मनोरंजक चित्रपटांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याने मुदस्सर अजीजचा चित्रपट साइन केला आहे. मुदस्सर अजीजच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जुलैमध्ये सुरू होणार आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मुदस्सर अजीजच्या चित्रपटासोबत अक्षय कुमारला एक सोशल ड्रामा आणि एक्शन थ्रिलर चित्रपटाची देखील ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमारकडे जवळपास एकूण १० चित्रपट आहेत. ज्यांचे शूटिंग २०२१ पर्यंत पूर्ण होईल.