संयामीला ‘मिर्झिया’साठी मिळाला आणखी एक अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 12:02 IST2016-12-20T11:59:20+5:302016-12-20T12:02:36+5:30

मूळची नाशिककर असलेल्या संयामी खेरने ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाई केली नसली तरी, ...

Another award for 'Mirziya' for Sanyamya | संयामीला ‘मिर्झिया’साठी मिळाला आणखी एक अवॉर्ड

संयामीला ‘मिर्झिया’साठी मिळाला आणखी एक अवॉर्ड

ळची नाशिककर असलेल्या संयामी खेरने ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाई केली नसली तरी, संयामीचे पर्दापण यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटासाठी तिला दुसरा अवॉर्ड मिळाला असून, त्याबद्दल ती खुश आहे. गेल्या सोमवारी (दि.१९) मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तिला ‘स्टारडस्ट कलर्स सॅनसुई’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 



नाशिकच्या संयामीला बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटासाठी मिळालेला हा अवॉर्ड नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे. मोठ्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘मिर्झिया’ चित्रपटात संयमीने कठोर परिश्रम व जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर आपल्या अभिनयाची छाप सोडत ‘फिल्मफेअर’ पटकाविले होते. आता या चित्रपटासाठी तिला हा दुसरा अवॉर्ड मिळाला आहे.



फॅशनिक दिग्दर्शक राकेश मेहरा यांच्या पहिलाच ‘मिर्झिया’ चित्रपट संयामीला अभिनयाची संधी मिळाली. स्टार पुत्र हर्षवर्धन कपूर बरोबर ती या चित्रपटात झळकली. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिश्मा दाखवू शकला नाही. तरी चित्रपट समीक्षकांनी संयामीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर महानायक अमिताभ बच्चनपासून ते शबाना आजमीपर्यंत सर्वांनीच ‘मिर्झिया’ची स्तुती संयामीला शुभेच्छा दिल्या होत्या. 


 
मिर्झियाचे कथानक, चित्रीकरण आणि हर्षवर्धनसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून संयामीचा अभिनय वाखाण्याजोगा ठरला आहे. यासाठी संयामीला अडीच वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. सोमवारी रात्री झालेल्या शानदार कार्यक्रमात ‘स्टारडस्ट कलर्स सॅनसुई’ पुरस्काराने संयामीला सन्मानित करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह दिग्दर्शक, निर्मात्यांनी तिचे कौतुक केले आहे. 

नाशिकचा गौरव
संयामीला मिळालेला ‘स्टारडस्ट कलर्स सॅनसुई’ पुरस्काराने मला खूप आनंद झाला असून, हे तिच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. ‘मिर्झिया’च्या अभिनयासाठी तिने स्वत:ला अडीच वर्षे झोकून दिले होते. तिचे कष्ट मी बघत होते. अत्यंत अवघड अशी भूमिका संयामीने उत्तमपणे साकारली. तिला मिळालेला हा पुरस्कार नाशिकसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. हा नाशिकचाच एकप्रकारे गौरव आहे. या चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान हॉर्स रायडिंग करताना ती घोड्यावरून पडून जखमीही झाली होती; मात्र जिद्दीने संयामीने यशस्वीपणे कथानकाला साजेसे अभिनय केले. त्याचे हे पहिले फळ तिला मिळाले. तिच्या भावी आयुष्यात असेच पुरस्कार तिला मिळावे. माझे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी आहे. 
- उत्तरा खेर, संयामीची आई

Web Title: Another award for 'Mirziya' for Sanyamya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.