अनिल कपूर आणणार आणखी एक अमेरिकन शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 19:31 IST2016-04-14T02:31:10+5:302016-04-13T19:31:10+5:30
दहशतवादावर आधारित अमेरिकन टीव्ही शो ‘२४’चा इंडियन रिमेक बनवल्यानंतर अनिल कपूर ‘मॉडर्न फॅमिली’चे टीव्ही वर्जन बनवण्यास उत्सूक आहे. याशिवाय ...

अनिल कपूर आणणार आणखी एक अमेरिकन शो
द शतवादावर आधारित अमेरिकन टीव्ही शो ‘२४’चा इंडियन रिमेक बनवल्यानंतर अनिल कपूर ‘मॉडर्न फॅमिली’चे टीव्ही वर्जन बनवण्यास उत्सूक आहे. याशिवाय एक नवा अमेरिकन शो आणण्याचे प्रयत्नही त्यांनी चालवले आहे. अनिल कपूर यांनी ‘२४’चे आॅफिशिअल राइट मिळवल्यानंतर २०१३ मध्ये याचा पहिला सीझन भारतात लाँच केला होता. याशिवाय अॅमी पुरस्कार पटकावलेल्या ‘मॉडर्न फॅमिली’च्या निर्मात्यांशी त्यांची बोलणी सुरु आहे. मात्र याशिवायही आणखी एक अमेरिकन टीव्ही शो भारतीय प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याचे प्रयत्न त्यांनी आरंभले आहेत. खुद्द अनिल कपूर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘मॉडर्न फॅमिली’नंतर काही अन्य गोष्टींवर मी काम करतो आहे. मात्र तूर्तास यासंदर्भात मी काहीही सांगू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. हॉलिवूडचा नवा चित्रपट केव्हा घेऊन येणार, असे विचारले असता, मला महिनाभराचा वेळ द्या. मी घोषणा करेल, असे ते म्हणाले.