एक महिन्यांच्या आता होणार 'बागी 3' च्या अभिनेत्रीच्या नावाची घोषणा, डिसेंबरमध्ये सुरु होणार चित्रपटाचे शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 11:38 IST2018-03-31T06:08:42+5:302018-03-31T11:38:42+5:30
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा बहुप्रतिक्षित चित्रपट बागी 2 शुक्रवारी जगभरातल्या जवळपास 3500 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी ...

एक महिन्यांच्या आता होणार 'बागी 3' च्या अभिनेत्रीच्या नावाची घोषणा, डिसेंबरमध्ये सुरु होणार चित्रपटाचे शूटिंग
ट यगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा बहुप्रतिक्षित चित्रपट बागी 2 शुक्रवारी जगभरातल्या जवळपास 3500 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 14 कोटींचा गल्ला जमावला आहे. आकड्यांचे ट्रेंडस बघता हा टायगर श्रॉफच्या करिअर मधला सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत टायगरच्या कोणत्याच चित्रपटाला ऐवढी चांगली ऑपनिंग मिळाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत होता. याच दरम्यान 'बागी 3'ची सुद्धा घोषणा करण्यात आली. 'बागी 2'चा ट्रेलर लाँच होण्याच्या एक दिवसाआधी निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी सोशल मीडियावर बागीच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली होती.
साजिदने एक ट्वीट करुन लिहिले होते, "आमचा उत्साह त्रिगुणीत झाला आहे. बागीच्या तिसऱ्या भागाची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ दिसणार आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे.
ALSO READ : Baaghi 2 movie review : टायगरची वन मॅन आर्मी
या ट्वीटनंतर प्रत्येकालाच या चित्रपटात टायगरची अभिनेत्री कोण असणार या गोष्टीची उत्सुकता लागली आहे. मात्र ही गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. 'बागी2'च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी साजिदने मीडियाशी बोलताना सांगितले की त्याच्या टीम चित्रपटातील अभिनेत्री कोण असणार याचा निर्णय घेईल एक महिन्याच्या आता अभिनेत्रीच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी असा ही रिपोर्ट आला होता की 'बागी 3'मध्ये टायगर सोबत दिशा दिसणार आहे. बागीच्या पहिल्या भागात टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. तर दुसऱ्या भागात टायगरची रिअल लाईफ गर्लफ्रेंड दिशा पटानी आहे. 'बागी3' चे शूटिंग या वर्षाच्या अखेर पर्यंत सुरु होणार आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल चायना आणि जपानमध्ये होऊ शकते.