​‘मणिकर्णिका’मध्ये ‘या’ अभिनेत्याशी रोमान्स करणार अंकिता लोखंडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:18 IST2017-09-03T10:48:11+5:302017-09-03T16:18:11+5:30

काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडेचे नाव कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाशी जोडले गेले. म्हणजेच अंकिताची या चित्रपटात वर्णी लागली. ‘पवित्र ...

Ankita Lokhande will romance her actress in 'Manikarnika'! | ​‘मणिकर्णिका’मध्ये ‘या’ अभिनेत्याशी रोमान्स करणार अंकिता लोखंडे!

​‘मणिकर्णिका’मध्ये ‘या’ अभिनेत्याशी रोमान्स करणार अंकिता लोखंडे!

ही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडेचे नाव कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाशी जोडले गेले. म्हणजेच अंकिताची या चित्रपटात वर्णी लागली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अंकिता दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवण्याच्या प्रयत्नात होती. अखेर तिला ब्रेक मिळाला. कंगनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी अंकिताने म्हणे, अनेक टीव्ही शोच्या आॅफर्स धुडकावून लावल्या. नुकतेच अंकिताने या चित्रपटाचे शूटींग सुरु केले आहे. अंकिता या चित्रपटात झलकारीबाईची भूमिका साकारणार आहे. आता अंकिताशी संबंधित एक नवी बातमी आहे.



होय, या चित्रपटात अंकितासोबत मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादी याचीही वर्णी लागल्याची खबर आहे. विशेष म्हणजे, अंकिता या चित्रपटात वैभवसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. वैभव या आधी संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात दिसलेला आहे. या चित्रपटात त्याने चिमाजी अप्पाची भूमिका साकारली होती. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात तो पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे. त्यामुळे वैभव सध्या जाम खूश आहे. कंगणाच्या चित्रपटात मला संधी मिळणे, खूप मोठी गोष्ट आहे. माझे या चित्रपटातील भूमिका प्रचंड इंटरेस्टिंग आहे. रोमान्स, अ‍ॅक्शन, ड्रामा असे सगळे करण्याची संधी मला यात मिळणार आहे, असे वैभव म्हणाला.
 सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईनेआपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते.   इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते.  

Web Title: Ankita Lokhande will romance her actress in 'Manikarnika'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.