VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 03:32 PM2020-09-07T15:32:41+5:302020-09-07T15:33:19+5:30

सुशांत सिंह राजपूतची ५० स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. आता त्याच्या फॅन्सने त्याची राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याला सुरूवात केली आहे.

Ankita Lokhande will fulfill Sushant Singh Rajput's dream, Fans will plant trees under the plants4ssr campaign | VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन!

VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन!

googlenewsNext

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक लिस्ट बनवत होता आणि त्यानुसार तो त्याचं दिवसाचं शेड्युल बनवत होता. सुशांत सिंह राजपूतची ५० स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. आता त्याच्या फॅन्सने त्याची राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याला सुरूवात केली आहे. येत्या १३ सप्टेंबरला सुशांतचे फॅन्स झाडे लावणार आहेत. सुशांत सिंह राजपूतचं स्वप्न होतं की, तो १ हजार झाडे लावणार. सुशांतच्या या फॅनच्या मोहिमेत आता त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेही सामिल झाली आहे. नुकतीच अंकिता लोखंडे तिच्या आईसोबत झाडे खरेदी करायला गेली होती. यावेळी देशातील जनतेला एक मेसेजही दिला.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ती सुरूवातीपासून सुशांतच्या केसची सीबीआय चौकशीची मागणी करत होती. तसेच ती रिया चक्रवर्तीने सुशांतबाबत केलेले अनेक दावेही खोटे असल्याचे सांगत होती. अंकिता अजूनही सुशांतच्या जाण्याच्या दु:खातून पूर्णपणे सावरलेली नाहीये. ती नेहमीच सोशल मीडियात सुशांतबाबत काहीना काही शेअर करत असते. 

दरम्यान, अंकिताचा आणि सुशांतचा एका फोटो सोशल मीडियात व्हायरल झालाय. ज्याला एका ऑडिओही आहे. ज्यात अंकिताचा आवाज आहे. एका मुलाखतीत अंकिताला विचारण्यात आले होते की, सुशांतला शेवटचा संदेश काय देशील. यावर अंकिता फार भावूक झाली होती. अंकिता म्हणाली होती की, 'मी फक्त एवढंच म्हणेन की, सुशांतवर प्रेम करणारे खूप लोक आहेत...तुझ्यासाठी पूर्ण देश उभा आहे. तुला फक्त एक हात पुढे करायचा आहे. तुला परत माझ्याजवळ बोलवायचं आहे आणि त्याने यावं'.

VIDEO : अंकिता लोखंडेने पोस्ट केला सुशांतसोबतचा एन्जॉय करतानाचा व्हिडीओ

VIDEO : अध्ययन सुमनने या व्हिडीओतून उलगडलं सुशांतचं पूर्ण आयुष्य, अंकिता लोखंडे झाली नि:शब्द!

'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'

Web Title: Ankita Lokhande will fulfill Sushant Singh Rajput's dream, Fans will plant trees under the plants4ssr campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.