अंकिता लोखंडेचा ‘किलर’ व्हिडीओ, ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ गाण्यावर दिलेत जबरदस्त एक्सप्रेशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:54 PM2021-02-10T12:54:14+5:302021-02-10T12:55:27+5:30

क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ

ankita lokhande video on madhuri dixit song are re are video viral on internet | अंकिता लोखंडेचा ‘किलर’ व्हिडीओ, ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ गाण्यावर दिलेत जबरदस्त एक्सप्रेशन 

अंकिता लोखंडेचा ‘किलर’ व्हिडीओ, ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ गाण्यावर दिलेत जबरदस्त एक्सप्रेशन 

googlenewsNext
ठळक मुद्देअंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावरही आपली ओळख निर्माण करणारी अंकिता लोखंडे सध्या काय करतेय, तर जुने आयकॉनिक गाणी रिक्रिएट करतेय. होय, या गाण्यांवरचे तिचे डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अलीकडे माधुरी दीक्षितच्या ‘धकधक करने लगा’ या गाण्यावर अंकिता थिरकताना दिसली होती. आता माधुरीच्याच ‘अरे रे अरे’ या गाण्यावर तिने जबरदस्त एक्सपे्रशन देत डान्स केला आहे. याचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आणि क्षणात तो व्हायरल झाला. 

या व्हिडीओत अंकिता ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आहे आणि ती कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या एक्सप्रेशनवर तर चाहते अक्षरश: फिदा आहेत. केवळ तासाभरात 30 हजारांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. सुपर, स्टनिंग, किलर, क्यूट, परफेक्ट अशा काय काय कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

याआधीच्या ‘धकधक करने लगा’ या गाण्यावर अंकिताच्या ‘कातिलाना’ डान्सवर चाहते असेच फिदा झाले होते. हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अंकिताने पिवळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती.
त्याआधी ती य् शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या ‘तितली’ या गाण्यावर थिरकली होती. 

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.
अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.

Web Title: ankita lokhande video on madhuri dixit song are re are video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.