अंकिता लोखंडे करणार 'तोरबाज'मध्ये संजय दत्तसोबत रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 13:09 IST2017-07-11T05:30:00+5:302017-07-11T13:09:43+5:30

अंकिता लोखंडेला पहिला चित्रपट मिळाल्यानंतर तिच्याकडे चित्रपटांची लाईन लागल्याचे दिसतेय. अंकिताला एका मागोमाग एका चित्रपट मिळताना दिसतायेत. नुकतेच अंकिताला ...

Ankita Lokhande romances with 'Taraab' in Sanjay Dutt | अंकिता लोखंडे करणार 'तोरबाज'मध्ये संजय दत्तसोबत रोमान्स

अंकिता लोखंडे करणार 'तोरबाज'मध्ये संजय दत्तसोबत रोमान्स

किता लोखंडेला पहिला चित्रपट मिळाल्यानंतर तिच्याकडे चित्रपटांची लाईन लागल्याचे दिसतेय. अंकिताला एका मागोमाग एका चित्रपट मिळताना दिसतायेत. नुकतेच अंकिताला कंगना रणौतचा बिग बजेट चित्रपट 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मध्ये साईन करण्यात आले आहे.  या चित्रपटात अंकिता झलकारीबाईची भूमिका साकारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिताला यानंतर तोरबाज या चित्रपटात झळकणार आहे. यात तिला संजय दत्तच्या अपोझिट कास्ट करण्यात आले आहे. संजय दत्त यात एक आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.  आफगाणिस्तानमध्ये लहान मुलांना बनवण्यात येणाऱ्या सुसाईड बॉम्बरबद्दल याचित्रपटाची कथा फिरते. तोरबाजसाठी संजय दत्तने गाणेसुद्धा लिहिले आहे. 2017ला हा चित्रपट फ्लोअरवर येणार आहे. याआधी या चित्रपटात चित्रांगदा सिंगला घेण्यात आले होते. मात्र आता अंकिताचे नाव या रोलसाठी फायनल झाल्याचे कळतेय. संजय आणि अंकिताची केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर किती आवडते हे लवकरच कळेल. 

ALSO READ : अंकिता लोखंडेला लॉन्च करणार कंगना राणौत!!

पवित्र रिश्ता या कार्यक्रमातून अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पवित्रा रिश्ता या मालिकेत तिने साकारलेली अर्चनाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती. यानंतर तिचे मालिकेतील सहकलाकार असलेल्या सुशांत सिंग राजपूतसोबत अफेअर सुरु झाले होते. मात्र मालिका संपल्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. यानंतर सुशांतने अर्चनाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. सुशांतच्या या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले. सुशांत प्रमाणेच अंकितालाही या चित्रपटातून असेच यश मिळेल अशी आशा आहे.  

Web Title: Ankita Lokhande romances with 'Taraab' in Sanjay Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.