अंकिता लोखंडेमुळे गमवावा लागला सुशांत सिंग रजपुतला हा अॅवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 13:28 IST2017-09-12T07:58:24+5:302017-09-12T13:28:24+5:30

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपूत हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. पुरस्कार सोहळ्यात, अनेक पार्टींमध्ये त्यांना एकत्र ...

Ankita Lokhande lost due to Sushant Singh Rajputla Award | अंकिता लोखंडेमुळे गमवावा लागला सुशांत सिंग रजपुतला हा अॅवॉर्ड

अंकिता लोखंडेमुळे गमवावा लागला सुशांत सिंग रजपुतला हा अॅवॉर्ड

किता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपूत हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. पुरस्कार सोहळ्यात, अनेक पार्टींमध्ये त्यांना एकत्र पाहायला मिळायचे. पण आता त्यांचे ब्रेकअप झाले असून ब्रेकअप नंतर ते दोघे एकमेकांच्या समोर येणे देखील टाळत आहेत आणि याचमुळे सुशांत सिंग रजपुतला त्याचा एक पुरस्कार गमवावा लागला.
झी रिश्ते अॅवॉर्ड नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला झी परिवारातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. झी टीव्हीवरील मालिकांनी अनेक सुपरस्टार या बॉलिवूडला मिळवून दिले आहेत. आर. माधवन, सुशांत सिंग रजपूत यांसारख्या अनेक कलाकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झी वरील मालिकांमधून झाली आहे. त्यामुळे या कलाकारांनी आजवर केलेल्या प्रगतीसाठी पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. आर.माधवन सारखा सुपरस्टार देखील या पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिला होता. पण सुशांत सिंग रजपूतने या पुरस्कार सोहळ्याला न जाणेच पसंत केले. 
खरे तर सुशांत सिंग रजपूतला झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार होते. पण सुशांत न आल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुशांत असा का वागला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
अंकिता लोखंडे आणि सुशांतची ओळख ही झी टिव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवरच झाली होती. पवित्र रिश्ता या मालिकेनेच सुशांतला घराघरात पोहोचवले. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळेच त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. तसेच अंकितादेखील आता बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
अंकिता ही झी परिवाराची सदस्य असल्याने ती झी रिश्ते अॅवॉर्ड पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहाणार होती. सुशांत या पुरस्कार सोहळ्याला गेला असता तर त्याला अंकिताचा सामना करावा लागला असता. त्यामुळेच त्याने झी रिश्ते पुरस्काराला न जाणेच पसंत केले असे म्हटले जात आहे. पण या सगळ्यात सुशांतचेच नुकसान झाले आहे. कारण यामुळे सुशांतला एक पुरस्कार गमवावा लागला. 

Also Read : पाहा सुशांत सिंग राजपुतच्या बालपणातील दुर्मिळ फोटो

Web Title: Ankita Lokhande lost due to Sushant Singh Rajputla Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.