'अ‍ॅनिमल' मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका साकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:19 AM2024-03-27T10:19:28+5:302024-03-27T10:19:50+5:30

'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर याचा खुलासा झालाय

animal fame actress indira krishna played lord ram mother kausalya in ranbir kapoor ramayan | 'अ‍ॅनिमल' मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका साकारणार?

'अ‍ॅनिमल' मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका साकारणार?

सध्या रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. रणबीर या सिनेमात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. सर्वांना 'रामायण' सिनेमाची उत्सुकता आहे. 'रामायण' च्या कास्टिंगबद्दल एकामागून एक कलाकारांचा खुलासा होत आहे. 'रामायण'च्या कास्टिंगबद्दल अजून एक महत्वाची माहिती समोर येतेय. सिनेमात श्रीरामांची आई कौसल्याच्या भूमिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या नावाची चर्चा आहे. 

'अ‍ॅनिमल' सिनेमा ज्यांनी पाहिलाय त्यांना आठवत असेलच की, सिनेमात रश्मिकाच्या आईच्या भूमिकेत एक सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकली. त्यांचं नाव इंदिरा कृष्णन. इंदिरा आता रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात माता कौसल्याची भूमिका साकारणार आहेत. इंदिरा या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून त्यांनी 'केसर', 'कहानी घर घर की', 'डोली सजा के वारीस', 'कृष्णदासी', 'ये है चाहते', 'सावी की सवारी' अशा मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. 

 'रामायण' सिनेमाच्या कास्टिंगबद्दल सांगायचं तर, सिनेमात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सितेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकत आहे. कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता तर बिभिषणाच्या भूमिकेत विजय सेतुपती झळकणार असल्याची चर्चा आहे. सनी आणि बॉबी देओल अनुक्रमे हनुमान आणि कुंभकर्णाच्या भूमिकेत झळकणार आहेत. नितेश तिवारी  'रामायण' सिनेमाचं दिग्दर्शन करत असून या वर्षाच्या अखेरीस सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: animal fame actress indira krishna played lord ram mother kausalya in ranbir kapoor ramayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.