रणबीरला ‘आॅल इंडिया रेडिओ’ का म्हणते अनुष्का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 11:24 IST2016-10-22T11:24:34+5:302016-10-22T11:24:34+5:30
‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये अनुष्का शर्मा व ऐश्वर्या राय बच्चन या दोघींसोबत रोमान्स करताना दिसणारा रणबीर कपूर सध्या प्रमोशनमध्ये ...

रणबीरला ‘आॅल इंडिया रेडिओ’ का म्हणते अनुष्का?
‘ दिल है मुश्किल’मध्ये अनुष्का शर्मा व ऐश्वर्या राय बच्चन या दोघींसोबत रोमान्स करताना दिसणारा रणबीर कपूर सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘ऐ दिल...’च्या प्रमोशनमध्ये त्याला जराही कसूर सोडायची नाही. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये रणबीरची एक नवी ओळख समोर आली. होय, रणबीर केवळ बॉलिवूडचा चॉकलेट हिरो, रोमान्स बॉय नाही तर त्याची आणखीही एक ओळख आहे. त्याची ही ओळख दुसºया कुणी नाही तर ‘ऐ दिल...’मधील त्याची को-स्टार अनुष्कानेच उघड केली आहे. ऐकायचीय? तर ऐका, ‘आॅल इंडिया रेडिओ’ अशी त्याची नवी ओळख आहे. अनुष्कानेच रणबीरचे हे नवे नाव ठेवले आहे. आता याचे कारणही बरेच इंटरेस्टिंग आहे. अनुष्काला स्वत:ला गॉसिपिंग करायला आवडत नाही. पण गॉसिपिंग ऐकायला मात्र खूप आवडते. खरे तर, पार्ट्यांमध्ये अनुष्का अजिबात ड्रिंक करत नाही. पण ड्रिंक केल्याची अॅक्टिंग मात्र करते. आपण ड्रिंक केलीय, म्हटल्यावर समोरचे मोकळेपणाने बोलायला लागतात. मग वेगवेगळी गॉसिप्स ऐकायला मिळतात, असे अनुष्का म्हणाली. पण अनुष्काच्या मते, गॉसिपिंगच्या बाबतीत रणबीर लाजवाब आहे. कारण, रणबीरकडे प्रत्येक व्यक्तिबद्दल गॉसिप आहे. म्हणूनच तिने त्याचे नाव ‘आॅल इंडिया रेडिओ’ ठेवले आहे. रणबीरचे हे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना? कारण ‘गॉसिपिंग क्वीन’ आपण ऐकलीय आता ‘गॉसिपिंग किंग’ही आपल्याला पाहायला मिळतो आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाकडून रणबीरला बºयाच अपेक्षा आहेत. यातील ऐश्वर्या व रणबीरचा ‘हॉट रोमान्स’सध्या चर्चेत आहे. या चर्चेचा रणबीरला किती फायदा होता आणि यामुळे रणबीरच्या करिअरला कसा कलाटणी मिळते, ते बघूच!!
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाकडून रणबीरला बºयाच अपेक्षा आहेत. यातील ऐश्वर्या व रणबीरचा ‘हॉट रोमान्स’सध्या चर्चेत आहे. या चर्चेचा रणबीरला किती फायदा होता आणि यामुळे रणबीरच्या करिअरला कसा कलाटणी मिळते, ते बघूच!!