एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; ‘या’ सुपरस्टार्सने दिला होता गॅरेजमध्ये निवारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 20:00 IST2017-09-30T13:48:15+5:302017-09-30T20:00:02+5:30

झक्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याच्यावर वाढत्या वयाचा काहीही परिणाम होत नाही. साठीतही त्याच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी ...

Anil Kapoor residing in a garage with family; The 'superstars' had given shelter in the garage! | एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; ‘या’ सुपरस्टार्सने दिला होता गॅरेजमध्ये निवारा!

एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; ‘या’ सुपरस्टार्सने दिला होता गॅरेजमध्ये निवारा!

्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याच्यावर वाढत्या वयाचा काहीही परिणाम होत नाही. साठीतही त्याच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आहे. अनिल कपूरने ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हार्डवर्क आणि जबरदस्त अदाकारीच्या जोरावर त्याने बी-टाउनमध्ये स्वत:चे एक वेगळेच स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे यंगस्टर्सला आजही त्याचा अभिनय भावत असून, तो सध्याच्या तरुण कलाकारांना आव्हान देण्याची हिम्मत ठेवतो. असो, आज आम्ही या यशस्वी अभिनेत्याला इथपर्यंतचा प्रवास करताना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याविषयी सांगणार आहोत. 

वास्तविक अनिलचे आयुष्य सुरुवातीपासूनच खडतर राहिले आहे. एक काळ तर असाही होता, जेव्हा त्याला परिवारासोबत एका छोट्याशा गॅरेजमध्ये राहावे लागत होते. होय, जेव्हा अनिल कपूरचे वडील सुरेंद्र कपूर परिवाराला घेवून मुंबईत आले होते, तेव्हा ते त्यांच्या परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहत होते. आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनिल कपूरने शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘तेजाब, मिस्टर इंडिया, विरासत, पुकार, ईश्वर, स्लमडॉग मिलिनेयरसारख्या सुपरहिट चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र हे वैभव मिळविण्यासाठी त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागले.  



अनिल कपूरचे आयुष्य सुरुवातीपासून सुखासमाधानाचे आणि चैनीचे होते असे नाही. जेव्हा अनिल कपूरचे वडील परिवाराला घेऊन मुंबईत आले होते, तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. अशात त्यांनी परिवारासमवेत गॅरेजमध्ये निवारा शोधला. बरेच दिवस त्यांना गॅरेजमध्ये काढावे लागले. होय, अनिल कपूरचे वडील परिवारासमवेत एकेकाळी शो मॅन राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहत होते. अतिशय कष्ट करून त्यांनी पुढे यश मिळविले. 

काही दिवस गॅरेजमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी एका सर्वसामान्यांच्या वसाहतीत एक खोली भाड्याने घेतली. पुढे सुरेंद्र कपूर यांनी आपल्या परिवाराला चांगले जीवन देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुरेंद्र कपूर दिग्दर्शक होते. पुढे त्यांनी मुलगा अनिललाही इंडस्ट्रीत आणले. अनिलने मुख्य अभिनेता म्हणून १९८० मध्ये एका तेलगू चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. अनिलच्या यशस्वीतेने त्याच्या परिवारालाही सावरले. 

Web Title: Anil Kapoor residing in a garage with family; The 'superstars' had given shelter in the garage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.