अंगिरा धरने केले या प्रसिद्ध दिग्दर्शकाशी गुपचूप लग्न, फोटो झाले व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 13:52 IST2021-06-26T13:50:00+5:302021-06-26T13:52:00+5:30
अंगिराने एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्न केले असून तिनेच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अंगिरा धरने केले या प्रसिद्ध दिग्दर्शकाशी गुपचूप लग्न, फोटो झाले व्हायरल
अंगिरा धरने विकी कौशलसोबत लव्ह पर स्क्वेअर फूटमध्ये काम केले होते. तसेच ती कमांडो 3 मध्ये झळकली होती. तिच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. तिने एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्न केले असून तिनेच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अंगिरा धरने दिग्दर्शक आनंद तिवारीसोबत गुपचूप लग्न केले. त्यांनी 30 एप्रिललाच लग्न केले असले तरी त्याने ही गोष्ट इतकी दिवस सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. पण आता अंगिराने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. अंगिरा आणि आनंदच्या लग्नाला अगदी जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
अंगिराने या फोटोसोबत लिहिले आहे की, 30 एप्रिलला अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत आम्ही लग्न केले. आमच्या मैत्रीला एक खूप चांगल्या नात्यात आम्ही गुंफले. सध्या सगळीकडे अनलॉक सुरू असल्याने आम्ही देखील आमची ही बातमी अनलॉक करत आहोत.
अंगिराने या फोटोत सुंदर लाल रंगाची साडी नेसली असून आनंदने शेरवानी घातली आहे. ते दोघे या फोटोत खूपच छान दिसत आहेत. या फोटोला काहीच तासांच एक लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. आनंद तिवारीने लव्ह पर स्क्वेअर फूटचे दिग्दर्शन केले होते.