अरबाजचा विषय काढताचा मलायका झाली नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:31 IST2016-10-10T14:17:09+5:302016-10-17T14:31:03+5:30
अरबाज खान व मलायका अरोरा यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या झळकत असतात. मात्र अरबाजच्या वाढदिवसाला मलायकाने हजेरी लावल्याने दोघेही एकत्र ...
.jpg)
अरबाजचा विषय काढताचा मलायका झाली नाराज
मुंबईतील एका कार्यक्रमात मलायका अरोरा पाहुणी म्हणून पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी ती संवाद साधत होती. अचानक एका पत्रकाराने तिला अरबाज खानविषयी प्रश्न विचारला. तू सोशल मीडियावर सक्रिय आहेस शिवाय अरबाजही सोशल मीडियावर सक्रिय आहेस असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून ती भडकली, आज प्रत्येकच जण सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे असे म्हणत अरबाजविषयी काही बोलण्याचे तिने टाळले. अरबाजविषयी प्रश्न वाढण्याआधी तिने या कार्यक्रमाचा निरोप घेतला.
सतरा वर्षे वैवाहिक जीवनात राहिल्यावर अचानक मलायक व अरबाज वेगवेगळे राहत असल्याच्या बातम्यांना मीडियाने चांगलीच प्रसिद्धी दिली होती. दरम्यान दोघेही एकत्र येणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता अरबाजच्या प्रश्नाने मलायका नाराज झाल्याची बातमी मीडिया प्रसिद्ध करणारच ना!