मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्समध्ये 'सैयारा' फेम अनीत पड्डाची एन्ट्री, कियारा अडवाणीची घेतली जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 15:43 IST2025-10-21T15:43:18+5:302025-10-21T15:43:39+5:30
मॅडॉकचा 'थामा' सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच 'शक्ती शालिनी'चं टायटल अनाऊंसमेंट करण्यात आलं आहे.

मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्समध्ये 'सैयारा' फेम अनीत पड्डाची एन्ट्री, कियारा अडवाणीची घेतली जागा?
'सैयारा' सिनेमातून रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्री अनीत पड्डाल लॉटरी लागली आहे. 'स्त्री','मुंज्या','भेडिया' आणि आता 'थामा'सारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सच्या आगामी सिनेमात अनीत पड्डाची एन्ट्री झाली आहे. 'शक्ती शालिनी' असं सिनेमाचं नाव आहे. मॅडॉकचा 'थामा' सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच 'शक्ती शालिनी'चं टायटल अनाऊंसमेंट करण्यात आलं आहे. त्यातच अनीत पड्डाच्या नावाचा खुलासा झाला आहे.
सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अनीत पड्डाला क्रिएटर, विध्वंसक आणि सर्वांची जननी संबोधलं आहे. तसंच एका फोटोत एक महिला जिची मोठी वेणी आहे ती पांढऱ्या साडीत जंगलात फिरताना दिसत आहे. ही महिला म्हणजे अनीत पड्डाच आहे. 'सैयारा'च्या यशानंतर अनीतला हा मोठा सिनेमा मिळाला आहे.
सुरुवातीला 'शक्ती शालिनी'याचवर्षी रिलीज होणार होता. मात्र आता सिनेमाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. पुढील वर्षी २४ डिसेंबरला सिनेमा भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे आधी या सिनेमात कियारा अडवाणीला घेणार असल्याची चर्चा होती. मात्र आता अनीतने तिची जागा घेतली आहे. अनीतचा हा पहिला हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधला सिनेमा असणार आहे.
अनीत पड्डाने 'सलमान वेंकी' सिनेमातून पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' सीरिजमध्ये दिसली. नंतर 'सैयारा'सिनेमाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं.