अन् सलमानची झाली पंचाईत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 21:49 IST2016-03-22T04:49:48+5:302016-03-21T21:49:48+5:30
सुपरस्टार सलमान खान याच्या आगामी ‘सुल्तान’ या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या चित्रपटासाठी सलमानने वजन बरेच वाढवले आहे. ...

अन् सलमानची झाली पंचाईत!!
स परस्टार सलमान खान याच्या आगामी ‘सुल्तान’ या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या चित्रपटासाठी सलमानने वजन बरेच वाढवले आहे. नेमक्या याच कारणामुळे अलीकडे दुबईत आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात सलमानची चांगलीच पंचाईत झाली. त्याचे झाले असे की, या अवार्ड शोच्या आयोजकांनी सलमानच्या जुन्या मापाचेच कपडे शिवले होते. सलमानला जेव्हा ते दिले गेले, तेव्हा साहजिकच ते तंग झाले. मग काय, सल्लूमियां भलताच संतापला. पण कमिटमेंट इज कमिटमेंट..मग त्याच तंग कपड्यात सलमानला चाहत्यांसमोर जावे लागले...तेही हसतमुखाने...पण सोहळा संपल्यानंतर सल्लूमियांने सर्वांना फैलावर घेतलेच...