...तर ‘लुटेरा’ मध्ये असते जॉन आणि विद्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:39 IST2016-12-14T17:39:20+5:302016-12-14T17:39:20+5:30

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा आणि ‘बेफिक्रे’ फेम रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘लुटेरा’ चित्रपट आठवतोय ना? दोघांच्याही उत्तम ...

... and 'Lootera' is in John and Vidya! | ...तर ‘लुटेरा’ मध्ये असते जॉन आणि विद्या!

...तर ‘लुटेरा’ मध्ये असते जॉन आणि विद्या!

लिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा आणि ‘बेफिक्रे’ फेम रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘लुटेरा’ चित्रपट आठवतोय ना? दोघांच्याही उत्तम केमिस्ट्रीमुळे या चित्रपटातील ‘सवार लूँ’ गाणे आवर्जून लक्षात राहते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोनाक्षीच्या अभिनयाला कौतुकाची थाप मिळाली. पण तुम्हाला हे माहितीये का? सोनाक्षीची भूमिका अगोदर विद्या बालनला मिळाली होती. तिने या चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला होता. जाणून घ्यायचेय का विद्याने का नाकारला हा चित्रपट? 



ती म्हणाली, ‘२००७ मध्ये ‘लुटेरा’ चित्रपटाचा प्रस्ताव माझ्याकडे आला. जॉन अब्राहम आणि मी हा चित्रपट करणार होतो. नंतर आम्ही ठरवलं की, तो चित्रपट करायचा नाही. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी हे ‘उडाण’ साकारण्यात बिझी झाले. सर्वांनी इतर प्रोजेक्ट्स स्वीकारले. काही दिवसांनंतर मला कळालं की, रणवीर आणि सोनाक्षी हे तो चित्रपट करणार आहेत. मी चित्रपट पाहिला मला त्यातील सोनाक्षी प्रचंड आवडली. त्यातल्या ‘मोंटा रे’ गाण्याला बंगाली फ्लेव्हर असल्याने मला ते प्रचंड आवडतं. मी जर ‘लुटेरा’ केला असता तर ते गाणं मी स्वत:वरच चित्रीत करून घेतलं असतं.’ 



‘बंगाली ब्युटी’ विद्या बालनला बॉलिवूडमध्ये तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये खूप चढ-उतार आल्याचे ती मानते. ‘बोल्ड अ‍ॅण्ड बिनधास्त’ अशा अनेक व्यक्तिरेखा तिने आत्तापर्यंत साकारल्या. तिचा ‘कहानी २’ नुकताच रिलीज झाला असून, त्याला उत्तम प्रतिसाद बॉक्स आॅफिसवर मिळताना दिसतोय. 

Web Title: ... and 'Lootera' is in John and Vidya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.