... अन् जॅकलीनने जॉनला उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 20:27 IST2016-06-25T14:23:39+5:302016-06-25T20:27:12+5:30

सिनेमाच्या पडद्यावरच बघायला मिळणाºया कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांनाच इच्छा असते. जॉन अब्राहमसारखा ‘मॅचो मॅन’, वरुण धवनसारखा ‘रोमँटिक हिरो’ आणि ...

... and Jacqueline picked John up | ... अन् जॅकलीनने जॉनला उचलले

... अन् जॅकलीनने जॉनला उचलले

ong>सिनेमाच्या पडद्यावरच बघायला मिळणाºया कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांनाच इच्छा असते. जॉन अब्राहमसारखा ‘मॅचो मॅन’, वरुण धवनसारखा ‘रोमँटिक हिरो’ आणि जॅकलीन फर्नांडिससारखी ‘ब्यूटी विथ ब्रेन’ यांना प्रत्यक्ष जवळून पाहण्याची संधी मिळाली तर क्या कहने! २९ जुलै रोजी प्रदर्शित होणाºया ‘ढिशूम’ या हिंदी चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या निमित्ताने ‘लोकमत’च्या माध्यमातून हे तिघेही स्टार नागपुरात आले होते. 

काय, वरुण धवन जॉन अब्राहमला उचलू शकतात? या प्रश्नाला वरुण धवन यांनी आणखी मजेदार करीत, काय जॅकलीन जॉन अब्राहमला उचलू शकते. यावर प्रेक्षकांमध्ये एक जल्लोष झाला.  जॅकलीन...जॅकलीन...नावाची घोषणा करीत प्रेक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले आणि पाहता पाहता जॅकलीनने जॉन अब्राहमला अलगद उचलले. यावर वरुणने ‘भारतीय नारी पड गयी भारी’ असे म्हणत तिचे कौतुक केले. 



जॅकलीन बसली पाठीवर तर वरुण बसला कुशीत 
 जॅकलीनने जॉन अब्राहमला उचलल्यानंतर ऋषी दर्डा यांनी प्रश्न टाकला, काय, जॉन या दोघांना उचलू शकतात. यावर प्रेक्षकांनी एकच कल्लोळ केला. जॉन अब्राहम उभा राहिला. त्याच्या पाठीमागून जॅकलीन चढली तर उडी मारत वरुण त्याच्या कुशीत स्थिरावला. अनपेक्षित असलेले हे दृश्य पाहून प्रेक्षक भारावून गेले. उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. 



मराठी मुलगा असल्याचा अभिमान
जेव्हा जॉन अब्राहमने वरुण आणि जॅकलीनला उचलले तेव्हा प्रेक्षकांमधून बाहुबली...बाहुबली म्हणून कोणीतरी ओरडले. त्याला उत्तर देताना जॉन म्हणाला, अरे मी मराठी मुलगा आहे. मला असे म्हणू नका. मराठी मुलगा असल्याचा मला अभिमान आहे.



‘बेटी बचाओ’ मोहिमेला समर्थन
 ढिशूम चित्रपटातील कलावंत जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस हे सभागृहात पोहचताच लोकमतच्या ‘बेटी बचाओ’ या मोहिमेला समर्थन देत फलकावर आपली स्वाक्षरी केली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांना या मोहिमेची माहिती देण्यात आली. 

 

Web Title: ... and Jacqueline picked John up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.