​- आणि सलग तीन रात्री झोपू शकली नाही रवीना टंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 16:30 IST2017-01-22T11:00:16+5:302017-01-22T16:30:16+5:30

अभिनेत्री रवीना टंडन लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. ‘द मदर’ हा रवीनाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ...

- And could not sleep for three consecutive nights Raveena Tandon | ​- आणि सलग तीन रात्री झोपू शकली नाही रवीना टंडन

​- आणि सलग तीन रात्री झोपू शकली नाही रवीना टंडन

िनेत्री रवीना टंडन लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. ‘द मदर’ हा रवीनाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रवीनाने आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग संपले पण रवीना कित्येक दिवस आपल्या भूमिकेतून बाहेर पडू शकली नाही. सलग तीन रात्री तिने जागून काढल्या. हे आम्ही नाही तर रवीनाने खुद्द सांगितलेय. ‘द मदर’ हा चित्रपट महिला हिंसाचारावर आधारित आहे. रवीना याबद्दल सांगते, ‘या चित्रपटाचे स्क्रिप्ट मला आवडले. पण सोबतच हे स्क्रिप्ट ऐकून माझे मन वेदनेने भरून आले. यानंतर शूटींग सुरु झाले आणि यानंतर जे झाले ते मी कधीच विसरू शकणार नाही. या चित्रपटाच्या भूमिकेत मी अशी काही शिरले की, त्यातून बाहेर यायला मला अनेक दिवस लागते. एका भयावह सीन्सच्या शूटींगनंतर सलग  तीन रात्री मी झोपले नाही. ते दृश्य माझ्या नजरेसमोरून हलतच नव्हते. मन वेदना आणि दु:खाने भरून आले होते. त्यातच मला दुसºयांदा चित्रपटाचे डबिंग करायला लागले. डबिंग संपले आणि माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागतेय. यातून सावरायला मला बराच वेळ लागला. माझ्यासाठी सगळेच डिस्टबिंग होते.’

Also read : द मदर’ मधून रवीना टंडन करणार कमबॅक!

‘द मदर’ हा सिनेमा दिल्लीतील बहुचर्चित गँगरेपवर आधारित असल्याचे बोलले जातेय. मात्र रवीनाने या वृत्ताचा इन्कार केलाय. या चित्रपटाला दिल्लीची पार्श्वभूमी आहे. पण निर्भया बलात्कार व हत्याकांडाशी या चित्रपटाचा काहीही एक संबंध नाही.
अश्तर सय्यद दिग्दर्शित आणि मायकेल पेलिको लिखित हा चित्रपट क्राईम थ्रिलर असा आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेता मधूर मित्तल हा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.



 

Web Title: - And could not sleep for three consecutive nights Raveena Tandon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.