..आणि चिरतरूण ‘हिरो’ वृद्ध झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 18:21 IST2016-12-01T18:21:27+5:302016-12-01T18:21:27+5:30

सतत तरुण दिसले पाहिजे, यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही नाही तो खटाटोप करताना दिसतात. अगदी सर्जरी ते वेगवेगळे डाएट प्लान ...

..and the chirrupar 'Hero' became aged! | ..आणि चिरतरूण ‘हिरो’ वृद्ध झाले!

..आणि चिरतरूण ‘हिरो’ वृद्ध झाले!

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सतत तरुण दिसले पाहिजे, यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही नाही तो खटाटोप करताना दिसतात. अगदी सर्जरी ते वेगवेगळे डाएट प्लान फॉलो करण्यापासून ते जिममध्ये घाम गाळण्यापर्यंत असे काय काय करून चिरतरूण दिसण्याचा सेलिब्रिटींचा आटापिटा सुरु असतो. पन्नाशी ओलांडलेली श्रीदेवी आजही तितकी ग्लॅमरस दिसते. तर पन्नासीचा सलमान, शाहरूख, आमीर त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलींसोबत रोमान्स करताना दिसतो, ते कदाचित याचमुळे. चिरतरूण दिसण्याच्या लालसेने बॉलिवूडमधील अनेक जण चित्रपटांत फार वयाची भूमिका करायला आजही धजावत नाही,अर्थात यालाही काही अपवाद आहेत. रियल वयापेक्षा पडद्यावर मोठ्या वयाची भूमिका साकारणारे असेच काही अभिनेते व त्यांच्या चित्रपटांविषयीची माहिती खास तुमच्यासाठी.. 
 
सलमान खान


 
सलमान खान त्याच्या भूमिकांबाबत नेहमी दक्ष असतो. पडद्यावर आपले फार वय  दिसणार नाही, याची तो सातत्याने काळजी घेताना दिसतो. पण याच सलमानने एका चित्रपटात चक्क वृद्धाची भूमिका साकारली होती. होय, ‘ये मजधार’ या चित्रपटात सलमानने एका म्हाताºया व्यक्तिच्या भूमिकेत पडद्यावर दिसला होता. या चित्रपटात मनीषा कोईराला ही देखील आहे. अर्थात हा चित्रपट फारसा चालला नसल्याने त्याची ही भूमिका कुणाच्या फार लक्षात नाही.
 
आमीर खान


‘दंगल’ या आगामी चित्रपटात आमीर खान याने कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांची भूमिका साकारली आहे. यात आमिर दोन मुलींचा बाप दाखविण्यात आला आहे. अर्थात या भूमिकेमुळे त्याच्या करिअरवर दूरगामी परिणाम होणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. त्याला प्रेक्षक किती स्वीकारतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 
 
अक्षय कुमार


आजही स्वत:पेक्षा निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करणाºया अक्षय कुमारने एका चित्रपटात पित्याची भूमिका साकारली होती, हे कदाचित तुम्हाला खरेही वाटणार नाही. पण ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ या चित्रपटता आदित्य रॉय कपूरच्या पित्याची भूमिका अक्षय कुमारने वठवली होती. त्यावेळी अक्षयचा लूक पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे आदित्यच्या आईची भूमिका ऐश्वर्या रॉय हिने केली होती. अर्थात हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला होता.
 
शाहरुख खान


रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान आजही नव्या हिरोंना मागे टाकतो. याच शाहरूखने ‘वीर जारा’ या चित्रपटात पांढºया केसांच्या वृद्धाची भूमिका केली होती. अर्थातच या चित्रपटात सुरुवातीला शाहरुख हा तरुण असतो. शाहरुखचा हा लूक त्याकाळी सर्वांनाच भावला होता. हा चित्रपटही खूप गाजला होता.  
 
अजय देवगण


अजय देवगण आणि काजोल या जोडप्याने ‘यू मी और हम’ या चित्रपटात वृद्धाची भूमिका साकारली होती. यासाठी त्याने मेकअपही बदलला होता. अर्थात लोकांना हा बदल फारसा आवडला असे म्हणता येणार नाही. कारण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.
 
 
हृतिक रोशन

हृतिक रोशनने एकदा नव्हे तर दोनदा  वृद्धाची भूमिका निभावली आहे. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’मध्ये त्याने अशी वृद्धाची भूमिका साकारली आहे. ‘क्रिश ३’मध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे. दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर झाले.

Web Title: ..and the chirrupar 'Hero' became aged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.