अॅण्ड द अवॉर्ड गोस टू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 20:59 IST2016-06-25T15:29:58+5:302016-06-25T20:59:58+5:30
लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी या ...

अॅण्ड द अवॉर्ड गोस टू...
फनी अवॉर्ड कुणाला?
- या प्रश्नावर वरुण धवन म्हणाला, पहिला पुरस्कार जॅकलीनला तर दुसरा पुरस्कार ‘हाऊसफूल तीन’चा नायक अक्षय कुमारला देईल.
चित्रपट सृष्टीतील ‘गुड बॉय अवॉर्ड’?
- जॅकलीनने काहीसा वेळ घेत, विचार करीत म्हणाली, हा अवॉर्ड सलमान खानला मिळायला हवा. याला पे्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘बेस्ट डान्सर’अवॉर्ड
- वरुण धवन म्हणाला की, हा पुरस्कार मी हृतिक रोशन यांना देईल. कारण ते एक उत्कृष्ट डान्सर आहेत. त्यांनी चित्रपट सृष्टीत नृत्यात वेगळेपण आणले आहे. प्रभूदेवा यांनाही मी हा पुरस्कार देईन.
मिस्टर हायपर अवॉर्ड
- जॉन अब्राहम म्हणाला हा अवॉर्ड वरुणचा भाऊ डायरेक्टर रोहित धवन याला देईल.
‘पॉलिटकल अवॉर्ड’
- वरुण धवनने हा प्रश्न विजय दर्डा यांच्याकडे ढकलला. यावर दर्डा म्हणाले, हा अवॉर्ड मी जॅकलीन फर्नांडिस यांना देईल.
‘लेटलतिफ’ अवॉर्ड
- या प्रश्नावर जॉन म्हणाला आमच्या टीममध्ये कोणीच ‘लेटलतिफ’ नाही. परंतु इंटस्ट्रीमध्ये ‘आयुषमान खुराना’ यांना देईल. तो सेटवर नेहमीच उशिरा पोहचतो.
सेल्फी अवॉर्ड
- लगेच वरुण म्हणाला, हा अवॉर्ड जॅकलीनला द्या. ती कुठेही सेल्फी काढायला लागते. असे म्हणताच, उपस्थितांमध्ये हंशा पिकल्या. यावर विजय दर्डा म्हणाले, हा अवॉर्ड रणवीर सिंहला द्या, कारण मी त्याला नेहमीच सेल्फी घेताना पाहतो.
‘सोशल मीडिया’ अवॉर्ड
- जॉन अब्राहम म्हणाला हा पुरस्कार मी वरुण धवनला देईल.
‘सबका बाप’ अवॉर्ड
- वरुण धवन म्हणाला, हा अवॉर्ड मी ‘सैराट’ या मराठी चित्रपटाला देईल. सध्या देशात हा चित्रपट गाजत आहे. हा चित्रपट मराठीत आहे. ही भाषा येत नसलीतरी त्यातील भावना हृदयाचा ठाव घेते. ‘सैराट’ आणि ‘ढिशूम’साठी जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला.