...या अभिनेत्रींनी बाप अन् मुलासोबत केला आॅनस्क्रिन रोमांस!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 16:20 IST2017-07-11T10:47:27+5:302017-07-11T16:20:11+5:30
जोपर्यंत तुमच्या सौंदर्याची जादू कायम आहे, तोपर्यंत तुम्ही बॉलिवूडवर राज करू शकता, हे काही बॉलिवूड अभिनेत्रींनी दाखवून दिले आहे. ...

...या अभिनेत्रींनी बाप अन् मुलासोबत केला आॅनस्क्रिन रोमांस!!
माधुरी दीक्षित
एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान असलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या चित्रपटांची आजही प्रेक्षकांना आतुरता लागून आहे. माधुरीने बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे माधुरीने कित्येक वर्ष बॉलिवूडवर वर्चस्व गाजविल्याने तिला दोन पिढ्यांसोबत स्क्रिन शेअर करता आली. ‘दयावान’ या चित्रपटात ती दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याबरोबर रोमान्स करताना दिसली. पुढे नऊ वर्षांनंतर विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना याच्याबरोबर ‘मोहब्बत’ या चित्रपटात तिने स्क्रीन शेअर केली.
श्रीदेवी
अभिनेत्री श्रीदेवी कपूर हिचा बॉलिवूडमधील प्रभाव आजही कायम आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या ‘मॉम’ या चित्रपटातून तिने हे दाखवून दिले आहे. श्रीदेवीचा हा ३०० वा चित्रपट होता. त्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येऊ शकतो की, श्रीदेवीचे बॉलिवूड करिअर किती प्रदीर्घ आहे. दरम्यान, श्रीदेवीने दोन पिढ्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ‘नाकाबंदी’ या चित्रपटात ती अभिनेते धर्मेंद्र यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत झळकली होती. पुढे तिने धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल याच्याबरोबर ‘चालबाज’ आणि ‘राम अवतार’ या चित्रपटात भूमिका साकारली.
राणी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र एक काळ असा होता की, राणी बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होती. त्यावेळी प्रत्येक कलाकार तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक होता. वास्तविक राणीचा बॉलिवूडमधील प्रभाव बराच काळ राहिला. त्यामुळे ती दोन पिढ्यांसोबत झळकली. ‘ब्लॅक’ आणि ‘बाबुल’ या चित्रपटांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले. ‘ब्लॅक’मधील राणीची भूमिका विशेष गाजली होती. तसेच तिने ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन याच्याबरोबर ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली.
डिम्पल कपाडिया
दोन पिढ्यांसोबत काम करणाºया अभिनेत्रींमध्ये डिम्पल कपाडियाच्याही नावाचा समावेश आहे. वयाच्या १६ व्या वर्षी ‘बॉबी’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया डिम्पलने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना आपलेसे केले. डिम्पलने अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली. त्याचबरोबर विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना यांच्यासोबतही ती झळकली.
अमृता सिंग
अभिनेत्री अमृता सिंग सध्या तिची मुलगी सारा अली खानमुळे लाइमलाइटमध्ये आहे. अमृताने ‘बेताब’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. चित्रपटात ती अभिनेता सनी देओल याच्याबरोबर झळकली होती. पुढे सहा वर्षांनंतर ‘सच्चाई की ताकत’ या चित्रपटात तिने धर्मेंद्र यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली.