गौरी खानने सजवलं अनन्या पाडेंचं स्वप्नातंल घर; शेअर केले Inside फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:26 PM2023-11-24T18:26:53+5:302023-11-24T18:29:42+5:30

अनन्याचं स्वप्नातलं घर स्वतः शाहरूख खानची पत्नी गौरी खानने सजवलं आहे.

Ananya Pade's dream house decorated by Gauri Khan; Inside photo shared | गौरी खानने सजवलं अनन्या पाडेंचं स्वप्नातंल घर; शेअर केले Inside फोटो

गौरी खानने सजवलं अनन्या पाडेंचं स्वप्नातंल घर; शेअर केले Inside फोटो

अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने अत्यंत आलिशान असे घर खरेदी केले. अनन्या पांडे हिने खरेदी केलेले हे घर कोट्यवधी रूपयांचे आहे. विशेष म्हणजे अनन्याचं स्वप्नातलं घर स्वतः शाहरूख खानची पत्नी गौरी खानने सजवलं आहे.

गौरी खान एक लोकप्रिय इंटिरिअर डिझाइनर आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांच्या घरांच डिझाइन गौरीने केलं आहे. अनन्याने सोशल मीडियावर आपल्या घराचे फोटो शेअर करत गौरी खानचे आभार मानले आहेत. नन्या पांडेने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझे पहिले घर... माझ्या स्वप्नातील घर... धन्यवाद गौरी खान. मला काय हवे आहे हे तुमच्याशिवाय दुसरे कोणीच समजू शकले नसते. तुम्ही बेस्ट आहात, लव्ह यू'.

गाैरी खान हिने अनन्या पांडे हिचे घर अत्यंत खास असे डिझाईन केल्याचे त्या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. हाॅलमधील दोन फोटो हे अनन्या पांडेने शेअर केले आहेत.  पलंग आणि टेबलांपर्यंत बेज रंगाचा वापर करण्यात आला आहे.  अनन्याच्या घरातील लिव्हिंग एरियाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भिंत, ज्यावर एक संदेश लिहिला आहे आणि फुले रेखाटली आहेत. गौरीने अनन्याच्या घराचं केलेलं डिझाइन प्रत्येकालाच आवडत आहे. सोशल मीडियावर या सगळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा नुकताच  'ड्रिम गर्ल २' हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या चित्रपटात अनन्या आयुष्मान खुरानासोबत झळकली. शिवाय, अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर मुंबईमध्ये अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत. 
 

Web Title: Ananya Pade's dream house decorated by Gauri Khan; Inside photo shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.