Video: अनंत अंबानींनी सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न, हे पाहताच शेरा आला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:43 PM2024-03-04T13:43:27+5:302024-03-04T14:14:32+5:30

अनंत अंबानी, सलमान खान आणि शेराचा मजेशीर Video

Anant Ambani tried to lift Salman Khan but he failed then bodyguard shera came and lift salman up | Video: अनंत अंबानींनी सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न, हे पाहताच शेरा आला अन्..

Video: अनंत अंबानींनी सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न, हे पाहताच शेरा आला अन्..

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा तीन दिवस थाटात पार पडला. गुजरातच्या जामनगरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हीआयपी सुरक्षाव्यवस्था, आलिशान सुविधा, आकर्षक सजावट, जगभरातील दिग्गज सेलिब्रिटी यामुळे सोहळ्यात रंगत आली. सर्वांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना शुभेच्छा दिल्या. काल रंगलेल्या पार्टीत अनंत अंबानी आणि सलमान खान यांचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सलमान खान आणि अंबानी कुटुंबाची खास मैत्री आहे. अनेकदा भाईजानसोबत त्यांचा बाँड दिसून आला आहे. अनंत (Anant Ambani) आणि सलमान खान (Salman Khan) यांचीही मैत्री खास आहे. कालच्या पार्टीतून हे स्पष्ट दिसून आलं. अनंत अंबानी यांनी अगदी ताकदीने सलमान खानला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अयशस्वी झाले. भाईजानचा बॉडीगार्ड शेरा हे बघतच होता. अनंत अंबानींना जमलं नाही हे पाहिल्यावर शेराने स्वत:च भाईजानला कडेवर उचलले. हे पाहून अनंत अंबानी अगदी लहान मुलासारखेच खूश झाले आणि उड्या मारायला लागले. सलमान खानही या सर्व प्रकारात न चिडता हसत होता. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगळीच कमेंट केली आहे. अंबानींच्या पार्टीत सलमान खानचा लूक पाहून नेटकरी घायाळ झालेत. 'सलमानच नवरा वाटतोय' अशा कमेंट्स भाईजानसाठी आल्या आहेत. सलमान खानने तीनही दिवस अंबानींच्या पार्टीत धमाल आणली. दुसऱ्या दिवशी सलमान, शाहरुख आणि आमिर या तीनही खानने स्टेजवर एकत्र येत आग लावली. सध्या सोशल मीडियावर अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याचेच व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.

Web Title: Anant Ambani tried to lift Salman Khan but he failed then bodyguard shera came and lift salman up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.