अमृता सिंग झळकणार हिंदी मीडियम या चित्रपटामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 15:11 IST2017-03-23T09:41:14+5:302017-03-23T15:11:14+5:30
अमृता सिंगने ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटातील भूमिकादेखील गाजल्या आहेत. पण प्रसिद्धीच्या झोतात असतानाच ...
अमृता सिंग झळकणार हिंदी मीडियम या चित्रपटामध्ये
अ ृता सिंगने ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटातील भूमिकादेखील गाजल्या आहेत. पण प्रसिद्धीच्या झोतात असतानाच अमृताने इंडस्ट्री सोडली. सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर तिने अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले. 15 वर्षं तरी ती कॅमेऱ्यासमोर फिरकली नाही. पण सैफ आणि तिचा घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनंतर ती अभिनयाकडे वळली. तिने एका मालिकेत काम केले होते. त्यानंतर टू स्टेटस या चित्रपटात तिने अर्जुन कपूरच्या आईची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. आता हिंदी मीडियम या चित्रपटात ती मुख्याध्यपकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खान आणि सबा कमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण अमृता ज्या शाळेत शिकली, त्या शाळेत करण्यात आले. आपल्याच शाळेत अनेक वर्षांनंतर जायला मिळाल्याने अमृता खूप खूश झाली होती. अमृताच्या शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण केले जावे असे अमृतानेच सुचवले होते. याविषयी या मालिकेचे दिग्दर्शक साकेत चौधरी सांगतात, "मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यध्यापिकेची भूमिका अमृता साकारत आहे. या भूमिकेसाठी अमृताच योग्य असल्याचे मला वाटल्याने मी तिला या भूमिकेसाठी विचारले. या चित्रपटात अमृताने साड्या घातल्या आहेत. या भूमिकेसाठी याच गेटअपमध्ये ती योग्य असल्याचे आमच्या सगळ्यांचे मत होते."
हिंदी मीडियम या चित्रपटात इरफान खान प्रेक्षकांना एका पंजाबी व्यवसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे दिल्लीतील चांदनी चौक येथे कपड्यांचे दुकान आहे. दिल्लीतील उच्चभ्रू लोकांनी त्यांना स्वीकारावे असे या व्यवसायिकाचे आणि त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे.