या चित्रपटातून होतोय ‘मोगॅम्बो’च्या नातवाचा डेब्यू, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 08:00 AM2019-08-30T08:00:00+5:302019-08-30T08:00:02+5:30

होय, अमरिश यांचा नातू वर्धन पुरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे.

amrish puri grandson vardhan puri bollywood debut with paagal | या चित्रपटातून होतोय ‘मोगॅम्बो’च्या नातवाचा डेब्यू, पाहा फोटो

या चित्रपटातून होतोय ‘मोगॅम्बो’च्या नातवाचा डेब्यू, पाहा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटात शिवालिका ओबेरॉय ही वर्धनची हिरोईन असणार आहे. शिवालिकाचाही हा डेब्यू सिनेमा आहे.

बॉलिवूडचे ‘मोगॅम्बो’अमरिश पुरी आज हयात असते तर नक्कीच त्यांना आनंद झाला असता. होय, नातवाचा पहिला चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे, हे पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलून आली असती. होय, अमरिश यांचा नातू वर्धन पुरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘पागल’ रिलीजसाठी तयार आहे.
बॉलिवूडमध्ये अमरिश पुरी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या अनेक आयकॉनिक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. त्याचमुळे त्यांचा नातू वर्धन याच्याकडूनही अनेकांना खूप अपेक्षा आहेत.


वर्धनने याआधी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमधून काम केले आहे. इतकेच नाही तर अनेक चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेय. इशकजादे, दावत - ए - इश्क, शुद्ध देसी रोमांस अशा अनेक चित्रपटांसाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले.


अमरिश यांचे गुरू आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते सत्यदेव दुबेकडून यांच्याकडून वर्धनने अभिनयाचे धडे घेतले. याकाळात दुबेंनी आधी त्याला बॅकस्टेजचे काम दिले. यादरम्यान वर्धनने  कास्ट आणि क्रू ला चहा देखील प्यायला दिला. अनेकदा स्टेजही साफ केला आहे.


 लुक्स आणि स्टाईलच्या बाबतीत वर्धन अन्य अभिनेत्यांच्या जराही मागे नाही. त्याचे अख्खे इन्स्टाग्राम अकाऊंट स्टाईलिश फोटोंनी भरलेले आहे. वर्धनचा डेब्यू चित्रपट ‘पागल’ हा एक रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट आहे. चिराग रूपारेल हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

या चित्रपटात शिवालिका ओबेरॉय ही वर्धनची हिरोईन असणार आहे. शिवालिकाचाही हा डेब्यू सिनेमा आहे. शिवालिकाने गतवर्षी टीव्ही अभिनेता करम राजपालसोबत साखरपुडा केला होता. 

Web Title: amrish puri grandson vardhan puri bollywood debut with paagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.