अमरिश पुरी आणि त्यांच्या पत्नीची या ठिकाणी झाली होती ओळख, पाहा त्यांच्या पत्नीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 06:14 PM2019-06-22T18:14:30+5:302019-06-22T18:16:07+5:30

अमरिश पुरी यांच्या पत्नीचे नाव उर्मिला दिवेकर असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Amrish Puri Birthday Special: Amrish puri wife urmila divekar pictures | अमरिश पुरी आणि त्यांच्या पत्नीची या ठिकाणी झाली होती ओळख, पाहा त्यांच्या पत्नीचे फोटो

अमरिश पुरी आणि त्यांच्या पत्नीची या ठिकाणी झाली होती ओळख, पाहा त्यांच्या पत्नीचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देअमरिश पुरी विमा कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत म्हणजेच त्यांनी ५ जानेवारी १९५७ ला लग्न केले.

बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. आज म्हणजेच २२ जूनला अमरीश पुरी यांचा वाढदिवस आहे. २२ जून १९३२ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. खरे तर  इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.

अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत दाखल आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असे म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवले होते. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी करायला सुरुवात केली. पण विमा कंपनीत काम करत असताना त्यांच्या आयुष्यात एक खूपच चांगली गोष्ट घडली. इथेच त्यांच्या पत्नीची आणि त्यांची ओळख झाली.

अमरिश पुरी विमा कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत म्हणजेच त्यांनी ५ जानेवारी १९५७ ला लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलीचे नाव नम्रता आहे. नम्रता ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती कॉस्च्युम डिझायनर देखील आहे. तर त्यांचा मुलगा राजीव हा बिझनेसमन आहे. 

अमरिश पुरी विमा कंपनीत नोकरी करत असले तरी अभिनयाचा किडा त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. त्यांनी पृथ्वी थिएटरमधील नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली.  त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातही त्यांनी हिंदी प्रमाणेच मराठी, कन्नड, पंजाबी, तेलगू, तामीळ, इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले.    

Web Title: Amrish Puri Birthday Special: Amrish puri wife urmila divekar pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.