‘दिल’चा सिक्वल येणार आमीर असेल पाहुणा कलाकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:48 IST2016-03-03T12:48:14+5:302016-03-03T05:48:14+5:30
सन १९९० मध्ये आलेला इंद्रकुमार यांचा ‘दिल’ हा चित्रपट तुफान गाजला होता. आमीर खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत हा ...

‘दिल’चा सिक्वल येणार आमीर असेल पाहुणा कलाकार?
स १९९० मध्ये आलेला इंद्रकुमार यांचा ‘दिल’ हा चित्रपट तुफान गाजला होता. आमीर खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत हा चित्रपट तरूणाईने अक्षरश: डोक्यावर घेतला होता. आमीरच्या करिअरमधील सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत. या सिक्वलमधील लीड रोलमध्ये आमीर फिट बसणार नाही, हे इंद्रकुमार आधीच सांगून चुकले आहेत.त्यामुळे साहजिकच या सिक्वलमध्ये आमीर लीड रोलमध्ये नसेल, हे स्पष्ट झालेय. तुम्ही आमीरचे चाहते असाल तर यामुळे तुमचा हिरमोड होणे साहजिक आहे. पण बातमी पुढे आहे. या सिक्वलमध्ये आमीर लीड रोलमध्ये नसला तरी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. इंद्रकुमार यांनी आमीरला चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. आमीरनेही ही आॅफर धुडकावून लावलेली नाही. तूर्तास आमीर अन्य चित्रपटांमध्ये बिझी आहे. यातून थोडी सवड मिळाली की, आमीर हा प्रस्ताव मनावर घेण्याची माहिती आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करू यात!