​अमिताभ नकळत करून बसले चूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 07:20 IST2016-03-18T14:20:25+5:302016-03-18T07:20:25+5:30

सोशल नेटवर्किंग साईटवर कायम सक्रीय राहणारे मेगास्टार अमिताभ बच्चन अलीकडे नकळत एक चूक करून बसले आणि नंतर त्यांनाच त्यांची ...

Amitabh is unknowingly wrong! | ​अमिताभ नकळत करून बसले चूक!!

​अमिताभ नकळत करून बसले चूक!!

शल नेटवर्किंग साईटवर कायम सक्रीय राहणारे मेगास्टार अमिताभ बच्चन अलीकडे नकळत एक चूक करून बसले आणि नंतर त्यांनाच त्यांची चूक उमगली. त्याचे झाले असे की,  अमिताभ यांची नात नव्या नवेली हिने टिष्ट्वटरवर भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल टष्ट्वीट केले. नव्याने क्रिकेटवर टिष्ट्वट केलेले पाहून अमिताभ हरकून गेलेत आणि त्यांनी लगेच नातीचे कौतुक केले. पण काही क्षणातच आपली नात टिष्ट्वटरवर नसल्याचे अमिताभ यांच्या लक्षात आले. नव्याच्या नावाने बोगस टिष्ट्वटर अकाऊंट तयार करण्यात आल्याचे त्यांना कळते. मग काय?? अमिताभ यांनी तातडीने आपली चूक दुरूस्त केली. माझी नात नव्या टिष्ट्वटरवर नाही. तिच्या नावाचे टिष्ट्वटर अकाऊंट बोगस आहे. त्यावर मी चुकून प्रतिक्रिया दिली, असे दुसरे टिष्ट्वट अमिताभ यांनी केले.
 

T 2178 - ALARM : my grand daughter Navya Nanda is not on Twitter ..
that account is fake ..!! I responded to it by mistake .. BE WARNED !!

Web Title: Amitabh is unknowingly wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.