अमिताभ ‘मोस्ट ट्रस्टेट ब्राण्ड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 10:14 IST2016-03-03T17:14:50+5:302016-03-03T10:14:50+5:30
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सलग दुसºया वर्षीही ‘मोस्ट ट्रस्टेट ब्राण्ड’ ठरले आहेत. दुसºया क्रमांकावर सलमान खान आणि तिसºया स्थानी ...
.jpg)
अमिताभ ‘मोस्ट ट्रस्टेट ब्राण्ड’
ब लिवूड महानायक अमिताभ बच्चन सलग दुसºया वर्षीही ‘मोस्ट ट्रस्टेट ब्राण्ड’ ठरले आहेत. दुसºया क्रमांकावर सलमान खान आणि तिसºया स्थानी सचिन तेंडुलकर याचे नाव आहे. महिलांमध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडा सर्वाधिक विश्वसनीय ब्राण्ड ठरली आहे. कॅटरिना कैफ हिच्याकडून पहिले स्थान हिसकावत प्रियंकाने हा पल्ला गाठला. ब्राण्ड ट्रस्ट रिपोर्ट-२०१६ ने मोस्ट ट्रस्टेट ब्राण्डची यादी जाहिर केली. ७३ वर्षीय बिग बींनी या यादीत अव्वल स्थान मिळवले. विशेष म्हणजे देशाच्या पूर्व भागात सलमान खान हा सर्वाधिक विश्वसनीय व्यक्ति ठरला आहे. दुसºया क्रमांकार सौरभ गांगुली आहे. तिसºया क्रमांकारवर अमिताभ, चौथ्या स्थानी शाहरूख खान आणि पाचव्या स्थानी आमीर खान असा क्रम आहे. चरित्र अभिनेते नाना पाटेकर यांनी या यादीत प्रथमच स्थान मिळवत सहावा क्रमांक मिळवला आहे. रतन टाटा सातव्या क्रमांकवर आहे.