ट्रंक कॉल व पत्रांच्या आठवणींमध्ये हरवले अमिताभ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 21:53 IST2016-06-04T12:07:14+5:302016-06-06T21:53:01+5:30
महानायक अमिताभ बच्चन आज अचानक जुन्या आठवणींमध्ये रमले. नातवंड व अन्य कुटुंबातील सदस्यांसोबत ‘फेसटाईम’(व्हिडिओ कॉल) करणाºया अमिताभ यांना आठवला ...

ट्रंक कॉल व पत्रांच्या आठवणींमध्ये हरवले अमिताभ!!
हानायक अमिताभ बच्चन आज अचानक जुन्या आठवणींमध्ये रमले. नातवंड व अन्य कुटुंबातील सदस्यांसोबत ‘फेसटाईम’(व्हिडिओ कॉल) करणाºया अमिताभ यांना आठवला तो पत्रांचा आणि ट्रंक कॉलचा जमाना..एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी लोक पत्रे पाठवायची...ट्रंक कॉल करायचे..ते क्षण अमिताभ यांना आठवले. आज जग आमूलाग्र बदललेय..त्या काळी पत्रे आणि ट्रंक कॉल होता. आज एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसटाईम कॉलसारखा सर्वोत्ताम पर्याय उपलब्ध आहे. मी आत्ताच जया व नातवंडांसोबत बोललो. ते या शहरात नसूनही त्यांच्याशी खूप साºया गप्पा मारल्या. समोर नसतांना जणू ते माझ्या पुढ्यात आहेत, असे मला वाटले...मज्जा आली.पण ते दिवस आजही आठवतात. घरात पहिल्यांदा टेलिफोन आला तो दिवस. तो काळ्या रंगांचा तो फोन..ट्रंक कॉल..त्या काळात एखाद्या शेजाºयाकडे फोन असायचा. एखादा अटीतटीच्या प्रसंगाचा निरोप त्याच शेजाºयाकडे यायचा..अशा अनेक आठवणी बिग बी यांनी सांगितल्या.