बडे मियाच्या रिमेकमध्ये अमिताभ-गोविंदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 16:36 IST2016-06-24T11:06:06+5:302016-06-24T16:36:06+5:30
अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या जोडीचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील अमिताभ आणि ...

बडे मियाच्या रिमेकमध्ये अमिताभ-गोविंदा?
अ िताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या जोडीचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील अमिताभ आणि गोविंदा यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाचा रिमेक लवकरच बनवला जाणार आहे. पण या चित्रपटात अमिताभ आणि गोविंदाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. या चित्रपटात अमिताभ आणि गोविंदा नसल्यास प्रेक्षकांची निराशा होईल याची निर्मात्यांना चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे बडे मियाँ छोटे मियाँच्या रिमेकमध्ये अमिताभ आणि गोविंदा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तरी झळकावेत असे निर्मात्यांना वाटत आहे. निर्माते वासू भगनानी चित्रपटाच्या एखाद्या तरी दृश्यात गोविंदा आणि अमिताभ झळकावेत यासाठी प्रयत्न करणार आहेत.