​अमिताभ बच्चन का मागताहेत आरजीव्हीची क्षमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 12:48 IST2016-12-21T12:48:05+5:302016-12-21T12:48:05+5:30

अमिताभ बच्चन म्हणजे बॉलिवूडचे महानायक़ शिवाय बॉलिवूडचे अतिशय विनम्र व्यक्तिमत्त्व. चूक झाली असे वाटले की ते अगदी नम्रपणे समोरच्याची ...

Amitabh Bachchan's apology for RGV? | ​अमिताभ बच्चन का मागताहेत आरजीव्हीची क्षमा?

​अमिताभ बच्चन का मागताहेत आरजीव्हीची क्षमा?

िताभ बच्चन म्हणजे बॉलिवूडचे महानायक़ शिवाय बॉलिवूडचे अतिशय विनम्र व्यक्तिमत्त्व. चूक झाली असे वाटले की ते अगदी नम्रपणे समोरच्याची क्षमा मागतात. आरजीव्ही अर्थात रामगोपाल वर्मा यांची काल त्यांनी अशीच माफी मागितली. कशासाठी तर, त्यांच्या एका इव्हेंटला ते जाऊ शकले नाहीत म्हणून. होय, हैदराबादेत आरजीव्ही यांनी एका रॅलीचे आयोजन केले होते. अमिताभ या रॅलीला हजर राहणार होते. पण ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान रद्द झाले. मग काय अमिताभ यांनाही आपला हैदराबाद दौरा रद्द करावा लागला. यासाठी अमिताभ यांनी Twitterवरून आरजीव्हीची क्षमा मागितली. अरे नाही...! आरजीव्हीच्या एका इव्हेंटसाठी हैदराबादला जाणार होतो. पण तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द झाले. क्षमा असावी. इव्हेंटला माझ्या खूप खूप शुभेच्छा...असे tweet अमिताभ यांनी केले.
आरजीव्ही यांचा ‘Vangaveeti’ हा पॉलिटिकल थ्रीलर सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर आरजीव्ही यांनी हैदराबादेत रॅलीचे आयोजन केले होते. 

{{{{twitter_post_id####}}}}


अमिताभ बच्चन लवकरच राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार3’मध्ये दिसणार आहे. येत्या २३ डिसेंबरला या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होणार आहे. २००५ साली राम गोपाल वर्माचा ‘सरकार3 सिनेमा रिलीज करण्यात आला होता. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सुभाष नागरे ही भूमिका साकारली होती. अमिताभ यांनी साकारलेली भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्वाशी मिळती-जुळती होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाचा दुसरा भागा २००८ साली ‘सरकार राज’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला. यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. यातही अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असून त्याच्यासोबत मनोज वाजपेयी, यामी गौतम, जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

Web Title: Amitabh Bachchan's apology for RGV?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.