​‘केबीसी’च्या सेटवर बिघडली अमिताभ बच्चन यांची तब्येत; ऐनवेळी शूटींग रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 13:07 IST2017-10-23T07:37:30+5:302017-10-23T13:07:30+5:30

‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोचे सगळ्यांत मोठे आकर्षण काय तर बिग बी अमिताभ बच्चन. होय, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय ...

Amitabh Bachchan suffers from 'KBC' set; Shooting at the same time! | ​‘केबीसी’च्या सेटवर बिघडली अमिताभ बच्चन यांची तब्येत; ऐनवेळी शूटींग रद्द!

​‘केबीसी’च्या सेटवर बिघडली अमिताभ बच्चन यांची तब्येत; ऐनवेळी शूटींग रद्द!

ौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोचे सगळ्यांत मोठे आकर्षण काय तर बिग बी अमिताभ बच्चन. होय, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय या शोची कल्पनाही करवत नाही. पण याच शोमुळे अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याची खबर आहे. होय, केबीसीच्या शेवटच्या एपिसोडच्या शूटींगदरम्यान अमिताभ यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यांना ऐनवेळी शूट रद्द करावे लागले. केबीसीच्या शूटींगदरम्यान सलग बोलल्यामुळे अमिताभ यांच्या घशामध्ये संसर्ग झाला. घशाला सूज आली. इतकी की, त्यांना खाणे पिणे तर दूर साधे पाणी पिणेही मुश्किल होवून बसले. त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटेना. अखेर त्यांची ती अवस्था पाहून शेवटच्या भागाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आणि अमिताभ घरी गेलेत.

यानंतर बिग बी यांनी स्वत: आपल्या ब्लॉगवर तब्येतीबाबत माहिती दिली. आता प्रकृतीत बराच सुधार आहे, असे त्यांनी लिहिले. केबीसीच्या अख्ख्या शूटींगदरम्यान अमिताभ यांच्या प्रकृतीच्या तक्रारींनी डोके वर काढले होते. अख्खे शूट त्यांनी अ‍ॅण्टीबायोटिक्स आणि पेनकिलर घेऊन पूर्ण केले.  शेवटच्या एपिसोडचे शूटींग करताना मात्र त्यांची प्रकृती आणखीच बिघडली. साहजिक अमिताभ यामुळे फारसे आनंदी नाहीत. केबीसी लवकरच संपत असल्याबद्दल आपल्या ब्लॉगमधून त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय काही महिन्यांच्या ब्रेकनंतर हा शो पुन्हा घेऊन येईल, असे वचन आपल्या चाहत्यांना दिले आहे. तोपर्यंत निश्चितपणे अमिताभ यांचे चाहते कळ सोसणार आहेत. कारण आधी म्हटल्याप्रमाणे अमिताभ यांच्याशिवाय या शोची कल्पनाच चाहत्यांना करवत नाही. तेव्हा अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच कामना करू यात.

ALSO READ; बिग बींचा केसीबी घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप ?

सध्या केबीसीशिवाय अमिताभ अनेक चित्रपटांत बिझी आहेत. त्यांचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ते आमिर खानसोबत दिसणार आहेत. याशिवाय ‘102 नॉट आऊट’ या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटातही अमिताभ दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे अमिताभ व ऋषी कपूर यांची जोडी २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणार आहे.

Web Title: Amitabh Bachchan suffers from 'KBC' set; Shooting at the same time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.