अमिताभ बच्चन यांनी केले सैराटचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 11:41 IST2017-01-27T06:11:38+5:302017-01-27T11:41:38+5:30
सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ नऊ महिने झाले आहेत. तरीही आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. ...
.jpg)
अमिताभ बच्चन यांनी केले सैराटचे कौतुक
स राट हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ नऊ महिने झाले आहेत. तरीही आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बकक्ळ कमाई केली. आतापर्यंतचा सर्वात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा हा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे कौतुक केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवुडच्या मंडळींनीदेखील केले आहे.
आमिर खान, सलमान खानसारख्या अभिनेत्यांनीहीदेखील या चित्रपटाची भरभरून प्रशंसा केली आहे. या चित्रपटानंतर मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा अनेक दिग्गज कलाकारांनी व्यक्त केली आहे.
![Sairat]()
प्रादेशिक सिनेमा सध्या बॉलिवूडइतकाच नावलौकिक मिळवत आहे. मराठी चित्रपटाने तर आता चांगलीच बाजी मारली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चनदेखील सैराट या मराठी चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. बिग बींनी नुकताच सैराट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. चित्रपट पाहिल्यावर लगेचच त्यांनी या चित्रपटाबाबत एक ट्वीट केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी सैराट पाहिला. हा चित्रपट पाहून मी प्रभावित झालो. अतिशय सुंदर मुव्ही आहे हा...
नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचे नाव बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध केले आहे. या चित्रपटाआधी त्याच्या फॅन्ड्री या चित्रपटानेदेखील राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली होती.
सैराट या चित्रपटाचा रिमेक आता कन्नड, तेलगू, हिंदी, पंजाबी, मल्याळम आणि तामीळ भाषेत बनवला जाणार आहे. हिंदी चित्रपट बनवण्याचे हक्क करण जोहरने घेतले असून श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
सैराट या चित्रपटात अाकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.