​अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिले ‘क्यूट’ सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 13:09 IST2017-05-29T07:35:46+5:302017-05-29T13:09:00+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. त्यामुळेच अमिताभ जेव्हा-केव्हा रविवारी मुंबई असतात, तेव्हा आपल्या चाहत्यांना ...

Amitabh Bachchan gave a surprise to the fans, 'Surprise'! | ​अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिले ‘क्यूट’ सरप्राईज!

​अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिले ‘क्यूट’ सरप्राईज!

ानायक अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. त्यामुळेच अमिताभ जेव्हा-केव्हा रविवारी मुंबई असतात, तेव्हा आपल्या चाहत्यांना आवर्जून भेटतात. गत ४० वर्षांपासून ‘जलसा’वर हा ‘सिलसिला’ अखंड सुरु आहे. काल रविवारीही यात खंड पडला नाही. अमिताभ काल रविवारी मुंबईत होते. मग काय, घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची भेट ते चुकवतील, असे शक्यच नाही. अमिताभ चाहत्यांना भेटायला घराबाहेर आलेत आणि तेही सोबत एक सरप्राईज घेऊन आलेत. होय, यावेळी अमिताभ नात आराध्या आणि सून ऐश्वर्या या दोघींना घेऊन चाहत्यांना सामोरे गेलेत.





यावेळी आराध्याने कलरफुल फ्रॉक घातला होता. अमिताभ यांपी आराध्याला कडेवर घेत चाहत्यांना अभिवादन केले. या क्षणांचे फोटो खरोखरचं सुंदर आहेत. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्येही याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलेय की, आराध्या सुरुवातीला इतक्या मोठ्या गर्दीला पाहून घाबरली होती. पण नंतर ती सहजपणे वावरली. अर्थात तिचे लक्ष त्या गर्दीपेक्षा एका मांजरीवर होते. ती मांजर तिला पाळायची होती. या मांजरीसोबत खेळतानाचा आराध्याचा एक क्यूट फोटोही त्यांनी शेअर केला आहे.



सोबत ऐश्वर्या, आराध्यासोबतचा एक फोटोही आहे. यात नात आणि सूनेसोबत रमलेले अमिताभ पाहणे चाहत्यांसाठी निश्चितपणे आनंददायी आहे. यापूर्वी गत १५ मे रोजी अमिताभ चाहत्यांना भेटले होते. यावेळी ते चाहत्यांसमक्ष मुलगी श्वेता बच्चन हिला पोझ देताना दिसले होते.
अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन व आमिर खान ही जोडी प्रथमच एकत्र येणार आहे.

Web Title: Amitabh Bachchan gave a surprise to the fans, 'Surprise'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.