राजपथावरील जवानांची प्रात्याक्षिके बघून महानायक अमिताभ बच्चन गहिवरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 10:44 AM2018-01-26T10:44:04+5:302018-01-26T16:14:35+5:30

आज देशभरात मोठ्या उत्साहाने ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, संस्था अशा विविध शासकीय, प्रशासकीय ...

Amitabh Bachchan gahiverale by watching the royal jawans! | राजपथावरील जवानांची प्रात्याक्षिके बघून महानायक अमिताभ बच्चन गहिवरले!

राजपथावरील जवानांची प्रात्याक्षिके बघून महानायक अमिताभ बच्चन गहिवरले!

googlenewsNext
देशभरात मोठ्या उत्साहाने ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, संस्था अशा विविध शासकीय, प्रशासकीय ठिकाणी तिरंगा फडकविण्यात आला असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. राजपथावर तर दरवर्षीप्रमाणे हा सोहळा खूपच संस्मरणीय ठरला. कारण देशांची सार्वभौमिकता, सामूहिक शक्ती आणि सांस्कृतीक एकतेचे दर्शन बघावयास मिळाले. खरं तर हे सर्व बघून अभिमानाने देशाबद्दलचा ऊर भरु न येतो. 

अशीच काहीशी स्थिती महानायक अमिताभ बच्चन यांची झाल्याचे बघावयास मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या जवानांची परेड बघून ते चांगलेच गहिवरल्याचे दिसून आले. आज अमिताभ बच्चन राजपथावर उपस्थित होते. परेडमध्ये भारतीय जवानांनी सादर केलेली प्रात्याक्षिके पाहुन अमिताभ बच्चन यांचा ऊर अभिमानाने भरून आला. 

पुढे बिग बींनी याबाबाते ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, प्रजासत्ताक दिनाची परेड पाहतो. हा अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा जवानांची परेड सुरु  होती तेव्हा डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जेव्हा आम्ही दिल्लीत होतो तेव्हा सीट पकडण्यासाठी धावायचे. जय हिंद! अमतिाभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्यासह मुलगा अभिषेक बच्चनचाही फोटो शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

Web Title: Amitabh Bachchan gahiverale by watching the royal jawans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.