अमिताभ: वेदना विसरायला २५ वर्षे लागलीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 20:50 IST2016-04-01T03:48:41+5:302016-03-31T20:50:20+5:30
अमिताभ बच्चन आणि बोफोर्स घोटाळा, आपणा सर्वांना ठाऊक आहेच. अमिताभ व त्यांचे कुटुंब या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप झाला ...

अमिताभ: वेदना विसरायला २५ वर्षे लागलीत
बच्चन कुटुंबाला फसवले गेले...
अमिताभ यांनी लिहिलेयं, बोफोर्स घोटाळ्यात माझे व माझ्या कुटुंबाला गोवले गेले आणि आमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू अधिकाधिक वाईट पद्धतीने सादर केला गेला. २५ वर्षांनंतर प्रॉसिक्युटरने सत्य समोर आणले. बच्चन कुटुंबाला फसवले गेले होते. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या जगात आरोप लावणे सोपे आहे. आरोप खरे की खोटे, याची शहानिशा करण्याची गरजही कुणाला अशावेळी वाटत नाही.
मी काय बोलणार होतो...
स्वीडनच्या एका व्हिसल ब्लोअरने २०१२ मध्ये क्लिनचीट दिली होती. मात्र दीर्घकाळ मला खोट्या आणि फसवणुकीचे ओझे वाहून न्यावे लागले. मला यात गोवण्यात आलेय, हे सिद्ध झाल्यावर माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. पण मी काय बोलणार होतो. २५ वर्षे मी ज्या वेदना भोगल्या त्या कशा कमी होणार होत्या. माझ्या मानहानीचे ते काळेकुट्ट व्रण मिटवता येऊ शकतील?