​आमीरचं वक्तव्य उद्धट-मनोहर पर्रिकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2016 05:31 AM2016-07-31T05:31:24+5:302016-07-31T11:01:24+5:30

देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच होते कशी, असा प्रश्न पर्रिकरांनी उपस्थित केला असून ‘एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीला देश सोडून बाहेर ...

Amir's remarks are rude-Manohar Parrikar | ​आमीरचं वक्तव्य उद्धट-मनोहर पर्रिकर

​आमीरचं वक्तव्य उद्धट-मनोहर पर्रिकर

googlenewsNext

/>
देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच होते कशी, असा प्रश्न पर्रिकरांनी उपस्थित केला असून ‘एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीला देश सोडून बाहेर जायचं असल्याचं सांगितलं. हे अत्यंत उर्मट व उद्धट वक्तव्य होतं. जरी माझं घर लहान असेल आणि मी गरीब असेन, तरी माझं माझ्या घरावर प्रेम असतं आणि मी घराचा बंगला करायचं स्वप्न पाहतो.’ असे म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आमीर खानला नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. आमीरचं वक्तव्य उद्धट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना  देशाच्या नागरिकांनीच धडा शिकवायला हवा, असेही ते म्हणाले. 
पर्रिकर शनिवारी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आले असता ते बोलत होते. त्या अभिनेत्याला आॅनलाईन ट्रेडिंग कंपनीनं जसा धडा शिकवला तसा धडा देशविरोधी वक्तव्य करणाºयांना शिकवायला हवा, असं पर्रिकर म्हणाले. अ‍ॅम्बेसेडर असलेल्या आॅनलाईन कंपनीला मोठा फटका बसला. अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतली, तर अनेकांनी मोबाईल अ‍ॅप अनइन्स्टॉल केलं. त्यानंतर संबंधित आॅनलाईन ट्रेडिंग कंपनीने त्याला जाहिरातीतून हटवलं, असं पर्रिकर म्हणाले.

Web Title: Amir's remarks are rude-Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.