/> क्रिकेटचे वेड कोणाला नसते हो. मॅच पाहण्याची झिंग तर सर्वांवरच चढलेली असते. आणि त्यात वर्ल्डकप म्हटले कि काही विचारुच नका. सध्या सुरु असलेले टी-टष्ट्वेंटी वर्ल्ड कप आपला बॉलीवुडचा परफेक्शनीस्ट आमीर देखील उत्साहाने पाहत आहे. भारत-आॅस्ट्रेलिया सामन्या दरम्यान विराट कोहलीने दमदार खेळ दाखवून कांगारुंना धुळ चारीत हा सामना जिंकला अन भारत फायनल मध्ये शामील झाला. विराटचे कौतुक तर सगळीकडेच झाले. परंतू आपल्या आमीरने विराटचे फक्त कौतुकच केले नाही तर त्याला सॅल्युट देखील केला. आमीर म्हणतोय, वॉट अॅन इनिंग, ही मॅच तर बुद्धीबळ, आर्चेरी आणि मॅरेथॉनचेच कॉम्बिनेशन असल्यासारखी वाटली. एवढेच बोलुन हा परफेक्शनीस्ट थांबला नाही तर त्याने क्रिकेटमधील आपला झळकता तारा विराटला सॅल्युट करुन लव अॅन्ड रिसपेक्ट असेही म्हटले आहे. आता खुद्द विराटला बॉलीवुडच्या या पी.के कडुनच सॅल्युट मिळाला म्हटल्यावर सध्या तो हवेत असणार यात शंका नाही. पण एवढ मात्र नक्की अपने विराट के तो दिन बन गये.