‘रेड’मध्ये ८५ वर्षीय अम्मा देत आहेत इलियाना डिक्रूजला टक्कर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 16:45 IST2018-03-25T11:15:51+5:302018-03-25T16:45:51+5:30
सुपरस्टार अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट दुसºया आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर आपला जलवा कायम ठेवून आहे. चित्रपटात अजय देवगण आणि ...

‘रेड’मध्ये ८५ वर्षीय अम्मा देत आहेत इलियाना डिक्रूजला टक्कर!!
स परस्टार अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट दुसºया आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर आपला जलवा कायम ठेवून आहे. चित्रपटात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला व्यतिरिक्त ८५ वर्षीय पुष्पा ज्योती यांच्या अभिनयाचे सातत्याने कौतुक केले जात आहे. पुष्पा जोशी यांनी ‘रेड’मध्ये अम्माची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर त्या अशा पहिल्या बॉलिवूड अभिनेत्री बनल्या आहेत, ज्यांनी वयाच्या ८५व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा अभिनय बघून त्या अभिनेत्री इलियान डिक्रूजवर भारी पडत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे.
पुष्पा जोशी यांनी ‘रेड’मध्ये अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर, चित्रपट समीक्षकांनीही कौतुक केले आहे. चित्रपटात पुष्पा जोशी यांच्या वाट्याला भलेही छोटीशी भूमिका आली आहे, परंतु त्यांनी त्यामध्येच आपली छाप सोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पुष्पा जोशी यांच्या डायलॉगपासून ते त्यांचे हावभाव आपल्या आजीची आठवण करून देतात. विशेष म्हणजे अजयची पत्नी काजोलने जेव्हा ‘रेड’ बघितला, तेव्हा तिने अम्माला आपल्या घरी घेऊन जाण्याविषयी म्हटले होते.
![]()
एका मुलाखतीदरम्यान, पुष्पा जोशी यांनीही काजोलच्या या वक्तव्यास संमती दर्शविली होती. आपल्या भूमिकेविषयी बोलताना पुष्पा जोशी यांनी सांगितले होते की, माझ्या वयाच्या व्यक्तींसाठीही चित्रपटात बºयाचशा भूमिका आहेत. विशेष म्हणजे कथेबरोबर पात्रही दमदार आहेत. भलेही पुष्पा जोशी यांनी ८५व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री केली असली तरी, त्यांना अभिनयाच्या जोरावर रातोरात स्टारडम मिळताना दिसत आहे.
![]()
पुष्पा जोशी या थिएटर कलाकार आहे. ‘रेड’ अगोदर त्यांनी ‘जायका’ या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला आहे. पुष्पा जोशी यांचा एक मुलगा आहे. ज्याचे नाव रवींद्र आहे. त्याचबरोबर त्यांना नातू आभास बºयाचशा रिअॅलिटी शोमध्ये झळकला आहे. ‘वॉइस आॅफ इंडिया आणि म्युझिक महामुकाबला’मधून त्याने आपली ओळख निर्माण केली. पुष्पा जोशी या मूळच्या जबलपूर येथील आहेत. परंतु गेल्या काहीकाळापासून त्यांचा परिवार मुंबईमध्ये राहत आहे.
![]()
दरम्यान, धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर ‘रेड’ने आतापर्यंत ६६.६० कोटी रूपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट ४० कोटी रूपये असल्याने हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे. अजयचा हा चित्रपट यावर्षीचा दुसरा हायएस्ट ओपनर ठरला आहे. ८०च्या दशकात उत्तर प्रदेश येथे आयकर विभागाच्या वतीने टाकण्यात आलेल्या एका रेडवर आधारित आहे.