शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:09 IST2024-11-06T18:07:31+5:302024-11-06T18:09:08+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांना शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांचे हे सिनेमा खूप आवडतो (donald trump)

शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे भारताचं नव्हे तर जगाचं लक्ष होतं. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढत रंगणार होती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत बाजी मारली असून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदा बॉलिवूडचे कोणते दोन सिनेमे त्यांना आवडतात, याचा खुलासा केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांना आवडतात हे दोन सिनेमे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले. डोनाल्ड ट्रम्प हे 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाअंतर्गत भारतात आले होते. कोविड काळाच्या अगोदर २०२० साली ट्रम्प यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भारतीय संगीत आणि सिनेमांंचं चांगलंच कौतुक केलं. याशिवाय त्यांच्या आवडत्या बॉलिवूड सिनेमांचाही उल्लेख केला होता. ट्र्म्प यांना शाहरुख खान-काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि अमिताभ-धर्मेंद्र यांचा आयकॉनिक 'शोले' सिनेमा खूप आवडतो, असं ते म्हणाले होते.
Trump mentioned about classic DDLJ in his speech. Listen how crowd started erupting 💥💥💥.
— PŔØFÉŠŠØŔ (@Myself_Prince_) February 24, 2020
WORLD'S BIGGEST SUPERSTAR FOR A REASON !#NamasteyTrump#TrumpInIndia
pic.twitter.com/79ivYeyzIa
ट्रम्प यांनीही केलाय सिनेमात अभिनय
अनेकांना माहित नसेल तर ट्रम्प यांनीही हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये अभिनय केलाय. ट्रम्प यांनी पहिल्यांदा १९८९ साली आलेल्या 'घोस्ट कान्ट डू इट' या सिनेमात अभिनय केला होता. याशिवाय त्यांनी 'सेक्स अँड द सिटी', 'स्पिन सिटी', 'दि लिटिल रास्कल्स', 'जूलैंडर' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये अभिनय केलाय. दरम्यान आज रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून आता ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत.