Ameesha Patel Birthday Special : अमिषा पटेलला कंटाळून या अभिनेत्याने काढला होता पार्टीतून पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:00 PM2019-06-09T19:00:00+5:302019-06-09T19:00:01+5:30

अमिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे.

  Ameesha Patel Birthday Special: Ranbir Kapoor LEFT A Party Because Ameesha Patel | Ameesha Patel Birthday Special : अमिषा पटेलला कंटाळून या अभिनेत्याने काढला होता पार्टीतून पळ

Ameesha Patel Birthday Special : अमिषा पटेलला कंटाळून या अभिनेत्याने काढला होता पार्टीतून पळ

googlenewsNext
ठळक मुद्देएका पार्टीत अमिषा पटेल रणबीरच्या मागे पडली होती. इतकी की, शेवटी रणबीरने पार्टीतून पळ काढणेच योग्य समजले होते. अमिषा पटेल वारंवार रणबीर कपूरशी बोलण्याचा प्रयत्न करत होती.

अमिषा पटेलचा आज म्हणजेच 9 जूनला वाढदिवस असून तिने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. 

अमिषा पटेलचा जन्म 9 जून 1976 ला मुंबईत झाला. तिने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी तिने अद्याप लग्न केलेले नाही. तिचे विक्रम भट्टसोबतचे अफेअर चांगलेच गाजले होते. त्यानंतर कनव पुरी या व्यवसायिकासोबत ती नात्याच असल्याची चर्चा रंगली होती. पण काहीच वर्षांत त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. अमिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण एकदा एका पार्टीत ती रणबीर कपूरचा पिच्छा करत असल्याने त्याने कंटाळून पार्टीतून पळ काढला होता. 

याविषयी डेक्कन क्रोनिकलने त्यांच्या वृत्तात म्हटले होते की, रणधीर कपूर यांच्या बर्थ डे पार्टीत अमिषाने हजेरी लावली होती. रणबीर कपूरने तिला या पार्टीत बोलावले गेल्याचे म्हटले गेले होते आणि या पार्टीतला रणबीर कपूरसोबतचा तिचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. पण या व्हायरल झालेल्या फोटोनंतर रणबीर कपूर खळबळून जागा झाला होता. त्यानंतर काही दिवसानंतर एका पार्टीत अमिषा पटेल रणबीरच्या मागे पडली होती. इतकी की, शेवटी रणबीरने पार्टीतून पळ काढणेच योग्य समजले होते. अमिषा पटेल वारंवार रणबीर कपूरशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. अमिषाला रणबीरशी काहीतरी खाजगीत बोलायचे होते. पण रणबीरच्या अवती-भवती अनेकांचा गोतावळा होता. पण असे असूनही अमिषा मात्र पूर्णवेळ रणबीरच्या मागे-पुढे फिरत होती. अखेर अमिषाच्या या वागण्यामुळे रणबीर इतका अस्वस्थ झाला होता की, पार्टी सोडून तो निघून गेला होता. 

Web Title:   Ameesha Patel Birthday Special: Ranbir Kapoor LEFT A Party Because Ameesha Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.