‘अम्मी’च आहे आमिर खानची महावीर फोगट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:44 IST2016-12-20T20:34:54+5:302016-12-21T16:44:53+5:30

दंगल चित्रपटात आमिर खानने महावीरसिंग फोगट या कुस्तीमधील वस्तादाची भूमिका साकारली आहे. आपल्या जीवनात आपली अम्मीच महावीरसिंग फोगट अर्थात ...

Ameer Khan's Aamir Khan's Mahaveer Phogat | ‘अम्मी’च आहे आमिर खानची महावीर फोगट

‘अम्मी’च आहे आमिर खानची महावीर फोगट

गल चित्रपटात आमिर खानने महावीरसिंग फोगट या कुस्तीमधील वस्तादाची भूमिका साकारली आहे. आपल्या जीवनात आपली अम्मीच महावीरसिंग फोगट अर्थात मार्गदर्शक असल्याचे आमिर खानने स्पष्ट केले.
दंगल चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने आमिर खान कोल्हापुरात ‘लोकमतची दंगल’ या कार्यक्रमासाठी आला असताना त्याने शिरोली एमआयडीसी येथील लोकमत कार्यालयास भेट दिली. या कार्यक्रमास लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, दंगलचे दिग्दर्शक नितीश तिवारी, अभिनेत्री फातिमा शेख, सानिया मल्होत्रा हे देखील उपस्थित होते.
लोकमत सीएनएक्सच्या संपादिका जान्हवी सामंत यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमिरने दिलखुलास गप्पा मारल्या. तुझ्या जीवनातील महावीर फोगट कोण आहे? या प्रश्नावर ‘आपली आई अर्थात अम्मी हीच आपल्यासाठी महावीर फोगट आहे. आपण जे काही आहोत, जो मी विचार करतो, ते माझ्या आईमुळे,’ असे तो म्हणाला. लहानपणापासून त्याची विचारसरणी, त्याचे व्यक्तीमत्त्व आणि त्याच्या आयुष्यावर त्याच्या अम्मीचा प्रभाव राहिला आहे. आपल्या आईचे आभार मानताना इतरही लोक त्याला आदर्शवत वाटतात. ‘आपल्याकडे कमी असूनही लोकांसाठी जे धावून जातात, ते आपल्यासाठी महत्त्वाचे वाटते. सत्यमेव जयते या मालिकेत अशा व्यक्ती आपल्याला भेटल्या. त्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल झाले, अशी कबुली त्याने दिली.
महावीर फोगट हे व्यक्तीमत्व आमिरला खूप आदर्श वाटते. ‘आपल्या मुलींमधील कौशल्य समजणे, इतक्या विरोधानंतर मुलींना घडविणे आणि सक्षम बनविणे, ही साधी गोष्ट नाही. आपल्या मुलींवर त्याने जो विश्वास टाकला तो महत्वाचा आहे. त्यामुळे महावीर फोगट याबद्दल आदर वाटतो,’ असे त्याने सांगितले. 
‘लोकमत’तर्फे प्रतिवर्षी ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश आयकॉन अवॉर्ड’ दिले जाणार आहेत. या पुरस्काराच्या ट्रॉफीचे आमिर खानच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी लोकमततर्फे आमिरला चांदीची गदा भेट देण्यात आली. कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास व खासदार धनंजय महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन आमिरचा सत्कार केला. आमिरच्या हस्ते ‘लोकमत’तर्फे प्रकाशित करण्यात येणाºया सखी पुरवणीच्या प्रिंटिंगचा प्रारंभही यावेळी करण्यात आला.
यावेळी लोकमतच्या कोल्हापूर आवृृत्तीचे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, लोकमत बॅ्रडिंगच्या व्हाईस प्रेसिडेंट शालिनी गुप्ता, सरव्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित होते. 

Web Title: Ameer Khan's Aamir Khan's Mahaveer Phogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.