"मला तेव्हा लाज वाटली...", काका अनु मलिक यांच्यावर MeTooचे आरोप, पहिल्यांदाच बोलला सिंगर अमाल मलिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:05 IST2025-07-13T15:04:34+5:302025-07-13T15:05:25+5:30
मीटू मोहिमेअंतर्गत अनु मलिक यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. याबाबत पहिल्यांदाच अनु मलिक यांचा पुतण्या आणि सिंगर अमाल मलिकने भाष्य केलं आहे.

"मला तेव्हा लाज वाटली...", काका अनु मलिक यांच्यावर MeTooचे आरोप, पहिल्यांदाच बोलला सिंगर अमाल मलिक
अनु मलिक बॉलिवूडमधील लोकप्रिय सिंगर आहेत. पण, मीटू मोहिमेअंतर्गत अनु मलिक यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. याबाबत पहिल्यांदाच अनु मलिक यांचा पुतण्या आणि सिंगर अमाल मलिकने भाष्य केलं आहे. तेव्हा याची लाज वाटल्याचा खुलासा अमाल मलिकने केला आहे. मीटूच्या आरोपांनंतर अनु मलिक यांच्यासोबत नातं तोडल्याचंही त्याने म्हटलं आहे.
अमाल मलिकने नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "जेव्हा मीटू मोहिमेत अनु मलिक यांच्यावर आरोप केले तेव्हा मी त्याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मी त्यांना सपोर्टही केला नव्हता. माझ्यासाठी हे धक्कादायक नव्हतं कारण मी त्यांना माझं कुटुंब मानत नाही. पण, जेव्हा त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले गेले तेव्हा मात्र मला लाज वाटली. आमच्यात काहीच नातं नाही. पण, मला वाटतं जर एवढे लोक त्यांच्यावर आरोप करत आहेत, तर त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल. पाच व्यक्ती एकाच व्यक्तीविरोधात तर बोलू शकत नाहीत".
"एकदा माझ्या वडिलांनी मला विचारलं की तुझंही नाव यात येईल का? मी त्यांना सांगितलं की असं होणार नाही. मी कधीच असा व्यक्ती नाही होऊ शकत. जो गाण्यासाठी शारीरिक संबंधांची मागणी करेल. माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या महिलांना सुरक्षित वाटतं", असंही त्याने पुढे सांगितलं.
अनु मलिक यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तो म्हणाला, "जेव्हा मी त्यांना बाहेर भेटतो तेव्हा मी त्यांना आदर देतो. पण, या सगळ्यानंतर मी त्यांच्यासोबतचं नातं तोडलं आहे. त्यांच्या कुटुंबासोबतही माझं काहीच नातं राहिलेलं नाही. किती वर्ष झाली मी त्यांना भेटलेलो नाही. त्यांना अरमानच्या लग्नात बोलवलेलं तेव्हा ते आले होते".